या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

येथील मरादू पालिकेच्या हद्दीतील चार अनधिकृत इमारती पाडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले त्याची अंमलबजावणी करताना शनिवारी त्यापैकी दोन आलिशान इमारती स्फोटकांच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आल्या. नियंत्रित स्फोटाद्वारे अवघ्या सहा सेकंदांत या इमारती ‘होत्याच्या नव्हत्या’ झाल्या!

होली फेथ एच२ओ आणि अल्फा सेरेन अपार्टमेण्ट हे ट्विन टॉवर्स या इमारती सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पाडण्यात आल्या. जैन कोरल कोव्ह आणि गोल्डन कायलोरम या अन्य दोन इमारती रविवारी पाडण्यात येणार आहेत.

या इमारती पाडण्यासाठी दोन इमारतींच्या खांबांवर विविध मजल्यांवर स्फोटके लावण्यात आली होती.  स्फोटानंतर हवेत मोठा धुरळा उडाला. ही घटना हजारो नागरिकांनी पाहिली. ही कारवाई करताना कोणत्याही पशुपक्ष्याला दुखापत झाली नाही, कोणीही जखमी झाले नाही, त्याचप्रमाणे अन्य मालमत्तेचेही नुकसान झाले नाही, असे पोलीस आयुक्त विजय साखरे यांनी सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Action against unauthorized buildings in kerala abn
First published on: 12-01-2020 at 00:33 IST