केंद्र सरकारने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेसह त्यांच्याशी संबंधित इतर आठ संघटनांवर पाच वर्षांसाठी बंदी घातल्यानंतर आता ट्विटरनेही गुरुवारी (२९ सप्टेंबर) मोठा निर्णय घेतला आहे. पीएफआयच्या अधिकृत हँडलसह काही पदाधिकाऱ्यांचे ट्विटर खाते बंद करण्यात आले आहेत.

ट्विटरने कारवाई केलेल्या पीएफआयच्या पदाधिकाऱ्यांमध्ये पीएफआयचा प्रमुख ओमा सलाम आणि सरचिटणीस अनिस अहमद यांचा समावेश आहे. दोघांनाही एनआयएने छापेमारीनंतर अटक केली आहे.

ट्विटरने ही कारवाई करताना संबंधित ट्विटर हँडलबाबत कायदेशीर मागणी झाल्यानंतर भारतासाठी ही कारवाई केल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे ही सर्व खाती भारतात बंद असणार आहे हे स्पष्ट होतंय.

केंद्र सरकारने पीएफआयच्या वेबसाईटसह सोशल मीडियावरील खाती ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत. यात पीएफआयशी संबंधित इतर आठ संघटनांच्या वेबसाईट आणि सोशल मीडिया खात्यांचाही समावेश आहे.

हेही वाचा : पीएफआयवरील बंदीचा असदुद्दीन ओवैसींकडून विरोध; ‘यूएपीए’ कायद्यावरुन भाजपा, काँग्रेसवर साधला निशाणा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पीएफआयच्या देशभरातील कार्यालयांवर एनआयएने दुसऱ्यांदा छापेमारी झाल्यानंतर केंद्र सरकारने ही कारवाई केली. आतापर्यंतच्या दोन छापेमारीत पीएफआयच्या २५० पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. तसेच अनेक कागदपत्रे जप्त करण्यात आले आहेत.