११ वर्षांच्या पाचवीत शिकणाऱ्या मुलीचा चार दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याची घटना समोर आली. या मृत्यूबाबत पोलिसांना संशय वाटत होता. त्यानुसार त्यांनी तपास केला आणि त्यानंतर मुलीच्या दत्तक आई वडिलांना अटक केली. पाचवीतल्या मुलीवर तिच्या दत्तक वडिलांनी बलात्कार केला. त्यानंतर दत्तक आई वडिलांनी या मुलीची हत्या केली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

काय घडलं प्रकरण?

२१ मार्चला पाचवीत शिकणाऱ्या मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी या मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. या अहवालात संशयित बाबी आढळून आल्या. त्यानंतर हा सगळा प्रकार उघड झाला आहे.

gangrape Nagpur
धक्कादायक! प्रियकराने दिला दगा अन् त्याच्या मित्रांनी सर्वस्व लुटले…
Nagpur, girl Abuse, Lover absconded,
नागपूर : लग्नाचे आमिष देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गर्भवती होताच प्रियकर फरार
Murderous assault including sexual assault on minor gril father and son fined three lakhs along with life imprisonment
अल्पवयीन मेव्हणीवर लैंगिक अत्याचारासह खुनी हल्ला; बापलेकाला जन्मठेपेसह तीन लाखांचा दंड
Navi Mumbai, a case registered, young woman suicide case
नवी मुंबई : युवतीच्या आत्महत्येप्रकरणी अखेर चार महिन्यांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
Mumbai, Sexual assault,
मुंबई : बारा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी पित्याला अटक
boy was molested, molest,
१० वर्षांच्या मुलावर दोघांकडून अत्याचार, एकाला अटक, दुसरा मुलगा अल्पवयीन
Father-daughter love
बाप असावा तर असा…! लेकीच्या घटस्फोटानंतर वाजत-गाजत आणलं घरी! वडिलांच्या ‘या’ कृतीचा समाजाने का घ्यावा आदर्श?
Solapur, Aba Kamble murder case,
सोलापूर : खून का बदला खून; आबा कांबळे खून खटल्यात वृद्ध पैलवानासह सातजणांना जन्मठेप

नेमकी काय घडली घटना?

पाचवीत शिकणाऱ्या मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या तिच्या दत्तक आई वडिलांनी केली. मदुराईमध्ये ही घटना घडली आहे. २०१४ मध्ये या मुलीची आई दीर्घ आजारामुळे वारली. त्यावेळी ही मुलगी अवघ्या सहा महिन्यांची होती. वडिलांनीही तिची जबाबदारी झटकली. त्यानंतर या मुलीच्या मावशीने आणि तिच्या पतीने या मुलीला दत्तक घेतलं. या मुलीचे दत्तक वडील सैन्य दलात सुभेदार पदावर होते. त्यांनी या मुलीला दत्तक घेऊन वाढवलं. या मुलीचा भाऊही काही महिन्यांपूर्वी वारला. मदुराई येथील एका तलावात बुडून त्याचा मृत्यू झाला.

मदुराईत राहात होती मुलगी

११ वर्षांची ही मुलगी पाचवीत शिकत होती. मदुराईमध्ये ती तिच्या दत्तक आई वडिलांसह राहात होती. २१ मार्चला या मुलीला रुग्णालयात आणलं गेलं. आमची मुलगी बेशुद्ध झाली आहे असं या दोघांनी रुग्णालयातल्या डॉक्टरांना सांगितलं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. या प्रकरणी पोलिसांनी संशयास्पद मृत्यूची नोंद केली. या मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. त्या अहवालात मुलीवर बलात्कार झाल्याची बाब उघड झाली. टाइम्स ऑफ इंडियाने याविषयीचं वृत्त दिलं आहे.

हे पण वाचा- नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी; दुकान मालकाचा महिलेवर बलात्कार

त्यानंतर पोलिसांनी मुलीच्या दत्तक आई वडिलांना ताब्यात घेतलं आणि त्यांची कसून चौकशी केली. ज्यानंतर ४८ वर्षीय दत्तक वडिलांनी हे मान्य केलं की या मुलीवर त्यांनी बलात्कार केला आणि तिचा लैंगिक छळ केला. त्यानंतर दत्तक वडिलांनी या मुलीची हत्या केली. या प्रकरणात मुलीच्या आईनेही त्यांना मदत केली. ज्यानंतर या दोघांना अटक करण्यात आली आहे. ४८ वर्षीय दत्तक वडील आणि त्यांची पत्नी या दोघांविरोधात मदुराई पोलिसानी कलम २०१, कलम ३०२ या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. POCSO कायद्यान्वयेही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांवर हत्येसह पुरावे नष्ट करणं आणि लैंगिक अत्याचार करणं याविषयीचेही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या दोघांना सध्या न्यायालयीन कोठडीत धाडण्यात आलं आहे.