अफगाणिस्तानात तालिबानने सत्ता हाती घेतल्यानंतर माजी राष्ट्रपती अशरफ घनी यांच्यासह मंत्र्यांनी पळ काढला. तालिबानच्या कामाची पद्धत माहिती असल्याने मृत्यूदंडाशिवाय दुसरी शिक्षा नाही, अशी भीती राष्ट्रपतींसह मंत्र्यांना होती. त्यामुळे सामान्य नागरिकांसह मंत्र्यांनी अफगाणिस्तान सोडण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रपती अशरफ घनी यूएईत आहेत. मात्र अफगाणिस्तानातून इतर देशात गेल्यानंतर अनेकांना रोजीरोटीचा प्रश्न भेडसावू लागला आहे. दुसऱ्या देशात गेल्यानंतर तिथलं राहणीमान आणि पद्धत शिकून घेताना नागरिकांना अडचणी येत आहेत. अशात एका माजी मंत्र्याला पूर्वीचा थाटमाट घेल्याने माजी मंत्र्याला जर्मनीत डिलिव्हरी बॉयचं काम करावं लागत आहे. कधी सुटाबुटात फिरणाऱ्या मंत्र्याला घरोघरी जाऊन पिझ्झा पोहोचावा लागत आहे. सोशल मीडियावर अफगाणिस्तानच्या माजी आयटी मंत्री सैयद अहमद शाह सादत यांचे फोटो अनेकांनी शेअर केले आहेत. तसेच जर्मनी फूड डिलिव्हरीचं काम करत असल्याचं सांगितलं आहे. सोशल मीडियावर त्यांचे फोटो वेगाने व्हायरल होत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माजी मंत्री सैयद अहमद शाह सादत आता जर्मनीतील ‘लीफरांदो नेटवर्क’साठी काम करत आहेत, अशी माहिती जर्मन मीडियाने दिली आहे. सादत जर्मनील लिपजिग शहरात सायकलवरून लोकांना पिझ्जा पोहोचवण्याचं काम करत आहेत.

सादत यांनी गेल्या वर्षी अफगाण मंत्रिमंडळातून राजीनामा दिला होता. ते २०१८ मध्ये कॅबिनेट मंत्री होते. मात्र अफगाणिस्तानातील घनी सरकारसोबत बाद झाल्याने त्यांनी २०२० मध्ये राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी जर्मनीत वास्तव्य करण्याचं ठरवलं.

यापूर्वी २००५ ते २०१३ या कालावधीत अफगाणिस्तानातील दूरसंचार आणि सूचना मंत्रालयात मुख्य सल्लागाराचं पद भूषवलं होतं. सादत यापूर्वी २०१६ ते २०१७ या कालावधीत लंडनच्या एरियाना टेलिकॉममध्ये सीईओ पदावर कार्यरत होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Afghanistan ex it minister work pizza delivery boy in germany rmt
First published on: 25-08-2021 at 13:25 IST