अमेरिकी सैन्य पूर्णपणे बाहेर पडल्यानंतर तालिबानने अफगाणिस्तानला स्वतंत्र झालेला देश घोषित केलं आहे. २० वर्षे चाललेल्या प्रदीर्घ युद्धानंतर अखेर अमेरिकेने अफगाणिस्तानातून आपले सैन्य मागे घेतले आहे. शेवटच्या अमेरिकी विमानाने अफगाणिस्तान सोडल्यानंतर अफगाणिस्तान अधिकृतपणे अमेरिकन सैन्यापासून मुक्त आहे. अमेरिका परत गेल्यामुळे तालिबान खूप आनंदी आहे. त्यांचा हाच आनंद त्यांनी साजराही केला आहे.

अमेरिकन सैन्याचे शेवटच्या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर तालिबान्यांनी हवेत गोळीबार करत आपला आनंद साजरा केला आहे. २० वर्षांच्या लष्करी हस्तक्षेपानंतर अमेरिकेच्या सैन्याने देश सोडल्यानंतर काही तासांनंतर अफगाणांचं त्यांच्या विजयाबद्दल अभिनंदन केले. काबूल विमानतळाच्या धावपट्टीवरून तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद म्हणाले, “अफगाणिस्तानचे अभिनंदन … हा विजय आपल्या सर्वांचा आहे. आम्हाला अमेरिका आणि जगाशी चांगले संबंध ठेवायचे आहेत. आम्ही त्या सर्वांशी चांगल्या राजनैतिक संबंधांचे स्वागत करतो”

Expired chocolate
एक्स्पायरी डेट उलटलेलं चॉकलेट खाल्ल्यानंतर दीड वर्षाच्या मुलीला रक्ताच्या उलट्या; दुकानावर कारवाई
Sarabjit singh pakistan prisoner
बावीस वर्षे पाकिस्तान तुरुंगात हालअपेष्टा सोसलेल्या सरबजित सिंग यांच्या मारेकर्‍याची हत्या; नेमके हे प्रकरण काय होते?
CM Mamata Banerjee On Attack NIA team
‘एनआयए’च्या पथकावर जमावाचा हल्ला, ममता बॅनर्जी यांनी तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनाच सुनावले, म्हणाल्या, “मध्यरात्री लोकांच्या घरात…”
clemen lobo arrested after 36 years in salim cassetwala murder case
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक

हेही वाचा – अमेरिकेने देश सोडल्यानंतर तालिबान्यांनमध्ये आनंदाची लाट;​​आकाशात गोळीबार करत व्यक्त केला आनंद

“अमेरिकन सैन्याने काबूल विमानतळ सोडले आहे आणि आपल्या देशाला पूर्ण स्वातंत्र्य मिळाले आहे,” असेही तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद यांनी मंगळवारी सांगितले. विजयाचा आनंद साजरा करताना तालिबान्यांनी फटाके फोडत आकाशात गोळीबार केला. तालिबान्यांनी शेवटचे अमेरिकी विमान सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास रात्रीच्या आकाशात पाहिल्यानंतर त्यांच्या हवेत गोळीबार केला आणि फटाके उडवले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तान सोडल्यानंतर भाष्य केलं आहे. अमेरिकेची २० वर्षांपासून अफगाणिस्तानातील लष्करी उपस्थिती आता संपली आहे, असे म्हटले आहे. बायडेन यांनी आपल्या कमांडर्सचे आभार मानत आणखी अमेरिकन नागरिकांचे आणखी जीव जाऊ न देता अफगाणिस्तानातून बाहेर काढले, असे म्हटले आहे.

१४ ऑगस्टपासून अमेरिकेने अफगाणिस्तानातून एकूण १,२३,००० लोकांना बाहेर काढले आहे. यामध्ये अमेरिकन नागरिक, अमेरिकीचे सहकारी मित्र आणि अफगाण नागरिक यांचा समावेश होता. ही अमेरिकेची सर्वात मोठी एअरलिफ्ट मोहित होती. ३१ ऑगस्ट रोजी दुपारी अफगाणिस्तानमध्ये आपली उपस्थिती न वाढवण्याच्या निर्णयावर लोकांना संबोधित करतील असे बायडेन यांनी म्हटले आहे.