Aftab Poonawala Latest Updates: संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणात आता आणखी एक महत्वाची घडामोड घडली आहे. आरोपी आफताब पूनावाला याने न्यायालयात आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. आफताबला कोठडी संपत असल्याने आज दिल्लीमधील साकेत कोर्टात हजर करण्यात आलं असता, त्याने न्यायाधीशांसमोर आपणच श्रद्धाची हत्या केली असल्याचं मान्य केलं. न्यायालयाने आफताबच्या कोठडीत चार दिवसांची वाढ केली आहे.

‘आपण रागाच्या भरात कोणताही विचार न करता हत्या केल्याचा’ दावा आफताबने न्यायाधीशांसमोर केला आहे. हत्येला सहा महिने झाले असून, काही गोष्टी आपल्याला आठवत नसल्याने पोलिसांना सांगू शकत नसल्याचंही त्याने म्हटलं आहे. तसंच आपण पोलिसांनी तपासात सहकार्य करत असून, यापुढेही करत राहू असं आश्वासन त्याने दिलं आहे.

cleaning dirt by hand, banning laws,
हाताने मैला साफ करण्याची कृप्रथा : बंदी घालणाऱ्या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करा, उच्च न्यायालयाचे आदेश
Death nurse, Corona, compensation husband,
करोनाकाळात परिचारिकेचा मृत्यू, पतीला नुकसानभरपाई नाकारण्याची राज्य सरकारची भूमिका संवेदनशील, उच्च न्यायालयाचे ताशेरे
kirit somaiya
“…म्हणून काही तडजोडी केल्या”, किरीट सोमय्यांचं वक्तव्य चर्चेत; म्हणाले, “आता मविआ सरकार असतं तर…”
jitendra awhad marathi news, lucky compound building collapse marathi news
“लकी कंपाऊंड दुर्घटनेनंतरही अधिकाऱ्यांनी शिकायला हवे होते, पण…”, आमदार जितेंद्र आव्हाड यांची पालिका अधिकाऱ्यांवर टीका

Shraddha Walkar Murder: “आफताबचे ते शब्द ऐकून मी खालीच कोसळलो…”, श्रद्धाच्या वडिलांनी मांडली व्यथा

दरम्यान पोलिसांनी सोमवारी महरौलीच्या जंगलात जबडा आणि काही हाडं सापडली आहेत. हा जबडा श्रद्धाचा आहे का याची माहिती घेण्यासाठी दिल्ली पोलीस एका डेंटिस्टकडे पोहोचले होते. डेंडिस्ट सध्या चाचपणी करत आहेत.

नार्को चाचणीआधी होणार पॉलिग्राफी चाचणी

आफताबची नार्को चाचणी करण्याआधी पॉलिग्राफ चाचणी करण्याची आवश्यकता आहे. कोर्टाने परवानगी दिली नसल्याने सोमवारी आफताबची नार्को चाचणी होऊ शकली नाही. दरम्यान कोर्टाने आता आफताबची पॉलीग्रीफी चाचणी करण्यास परवानगी दिली आहे. आफताबनेही त्यासाठी संमती दर्शवली असल्याची माहिती आहे.

Shraddha Murder Case: तिचा गळा दाबणं सोपं होतं, पण…; मृतदेहाचे ३५ तुकडे करणाऱ्या आफताबचा पोलिसांकडे धक्कादायक खुलासा

नेमकं प्रकरण काय?

वसईतील २६ वर्षीय श्रद्धा वालकर या तरुणीची तिच्याच प्रियकराने दिल्लीत खून करुन मृतदेहाचे ३५ तुकडे केल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर खळबळ माजली आहे. आरोपी प्रियकर आफताब पूनावाला याने मृतदेहाचे तुकडे तीन आठवडे फ्रीजमध्ये ठेवले. त्यानंतर ते जंगल भागात विविध ठिकाणी फेकून दिले. सहा महिन्यानंतर हे क्रौर्य उघडकीस आलं आहे.

श्रद्धाने प्रियकर आफताब अमीन पूनावाला याच्याकडे लग्नाचा तगादा लावल्याने त्याने तिची खून केल्याचं तपासात उघड झालं आहे. कुटुंबीयांनी आंतरधर्मीय विवाहास नकार दिल्याने दोघेही घर सोडून दिल्लीत वास्तव्यास आले होते. पोलिसांनी आरोपी पूनावाला याला अटक केली आहे.

Shraddha Murder Case: आम्ही आफताबच्या घरी लग्नाची बोलणी करण्यासाठी गेलो होतो, पण त्यांनी…; श्रद्धाच्या वडिलांचा मोठा खुलासा

चौकशीदरम्यान आफताबने पोलिसांसमोर काही धक्कादायक खुलासे केले आहेत. मृतदेहाची विल्हेवाट लावणं कठीण असल्याने आपण त्याचे तुकडे करण्याचं ठरवलं. यासाठी आपण इंटरनेटची मदत घेतली. आपला आवडता टीव्ही शो ‘डेक्स्टर’मुळे आपल्याला मदत झाली असं त्याने सांगितलं आहे.

आफतबाने सर्वात आधी ३०० लीटरचा एक फ्रीज खरेदी केला. त्याने काही वर्षांपूर्वी शेफ होण्यासाठी प्रशिक्षण घेतलं होतं. त्या कौशल्याचा फायदा त्याने मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी घेतला. कोणलाही शंका येऊ नये यासाठी त्याने मृतदेहाचे फार छोटे छोटे तुकडे केले.

PHOTOS: मुंडकं कापून फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर आफताब रोज श्रद्धाचा चेहरा पाहायचा, धक्कादायक खुलासे ऐकून पोलीसही चक्रावले

मृतदेहाचे ३५ तुकडे केल्यानंतर आफताबने ते सर्व फ्रीजमध्ये ठेवले. सोबतच डझनभर डिओड्रंट, परफ्यूम आणि सुंगंधी काड्याही भरल्या.पुढील १६ दिवस आफताब मृतदेहाची विल्हेवाट लावत होता. रोज रात्री २ वाजता तो मृतदेहाचे एक किंवा दोन तुकडे बॅगेत भरुन घराबाहेर पडत असे. रोज नव्या ठिकाणी जाऊन गटार किंवा जंगलाच्या भागात तो मृतदेहाचे तुकडे फेकून देत असे. कचरा वेचणाऱ्यांना शंका येऊ नये यासाठी तो त्याचे आणखी छोटे तुकडे करत असे. मृतदेहाचा तुकडा फेकून दिल्यानंतर ती पिशवी तो दुसऱ्या ठिकाणी फेकून देत होता.