दिल्लीतील शाळा, विमानतळ आणि रुग्णालयानंतर आता तिहार तुरुंगात बॉम्बस्फोट करण्याची धमकी देण्यात आली आहे. आज (मंगळवारी) ईमेलद्वारे तुरुंग प्रशानाला ही धमकी प्राप्त झाली. याप्रकरणी दिल्ली पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. तसेच ईमेल पाठवणाऱ्याचा शोध घेतला जात आहे. याबरोबरच याठिकाणी बॉम्ब स्कॉडदेखील तैनात करण्यात आल्याची माहिती आहे.

हेही वाचा – अरविंद केजरीवालांच्या निवासस्थानी मारहाण झाल्याचा स्वाती मालीवाल यांचा आरोप; तक्रार दाखल

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणारा एक ईमेल आज तिहार तुरुंग प्रशासनाला प्राप्त झाला होता. त्यानंतर तिहार तुरुंग प्रशासनाने याची माहिती दिल्ली पोलिसांना दिली. दिल्ली पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत घटनेचा तपास सुरू केला. तिहार तुरुंगात सध्या हाय प्रोफाईल प्रकरणातील आरोपींना ठेवण्यात आलं आहे. यामध्ये काही राजकीय नेत्यांचादेखील समावेश आहे.

विशेष म्हणजे अशाच प्रकारच्या धमकीचा ईमेल सोमवारी दिल्लीतील काही रुग्णालयांना प्राप्त झाला होता. यामध्ये जीटीबी रुग्णालय, दादा देव रुग्णालय, हेडगेवार रुग्णालय आणि दीप चंद्र बंधू रुग्णालय या महत्त्वाच्या रुग्णालयांचा समावेश आहे. दरम्यान, काल धमकी ईमेल मिळताच दिल्ली पोलिसांनी या रुग्णालयात दाखल होत तपास केला. मात्र, त्यांना संशयास्पद अशी कोणतीही वस्तू आठळून आली नाही.

हेही वाचा – अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा; मुख्यमंत्रीपदाबाबत…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अशाच प्रकारची धमकी काही दिवसांपूर्वी दिल्लीतील १०० पेक्षा जास्त शाळांना मिळाली होती. यामध्ये मयूर विहार येथील मदर मेरी स्कूल, द्वारका येथील दिल्ली पब्लिक स्कूल, चाणक्यपुरी येथील संस्कृती स्कूल, वसंत कुंज येथील दिल्ली पब्लिक स्कूल आणि साकेतमधील एमिटी स्कूल यांचा समावेश होता. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी शाळांची झडती घेतली. मात्र, या ठिकाणी कोणीही बॉम्बसदृष्य वस्तू आढळून आली नव्हती.