कर्नाटकमधील बागलकोट जिल्ह्यामध्ये मागील आठवड्यामध्ये झालेल्या एका अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाने भरधाव वेगात गाडी चालवत एका बाईकला धडक दिली. यामध्ये एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने आता या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण चांगलच तापलं आहे. असं असतानाच आरोपीचे वडील आणि उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांनी या प्रकरणामध्ये राजकीय हेतूने जाणूनबुजून आपल्या मुलाचं नाव गोवलं जात असल्याचा आरोप केलाय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पत्रकारांशी संवाद साधताना भाजपाचे नेते असणाऱ्या सावदी यांनी माझ्या मुलाला म्हणजेच चिदानंद सावदीला या प्रकरणामध्ये उगाच अडकवलं जात आहे. अपघात झाला तेव्हा माझा मुलगा गाडी चालवत नव्हता असं सावदी म्हणालेत. तसेच या घटनेचा राजकीय हेतूने वापर केला जात आहे. या मागे कोण आहे याचा मी नक्की शोध घेईन, असं सावदी यांनी म्हटलं आहे. उपमुख्यमंत्री असण्याबरोबरच सावदी हे कर्नाटकचे परिवहन मंत्री देखील आहेत. याच संदर्भात पत्रकारांनी तुमच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय का असा प्रश्नही सावदी यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना. “तो (चिदानंद) हा फॉर्चुनर कारमध्ये होता. अपघात झाला त्या ठिकाणापासून ही गाडी फार पुढे होती. दुसऱ्या गाडीने (एमजी ग्लोस्टर जी चिदानंदच्या मालकीची आहे) धडक दिल्याने हा अपघात झाला. माझ्या मुलाचं नाव एफआयआरमधून वगळण्यात आल्याचे आरोप केले जात आहेत. मात्र हे आरोप खरे नाहीत. एकदा या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली की सत्य समोर येईल,” असं सावदी म्हणालेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After son car kills one karnataka deputy cm savadi says politics being mixed into accident scsg
First published on: 14-07-2021 at 07:40 IST