परराष्ट्र मंत्रालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगामी दौऱ्याची माहिती दिली. नरेंद्र मोदी रोम आणि ग्लासगोला भेट देणार आहेत. परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी २९ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान रोममध्ये असतील.

एएनआय वृत्तसंस्थेनुसार, परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला यांनी सांगितले की “पंतप्रधान मोदींच्या रोम आणि ग्लासगो दौऱ्यावर जाणार आहेत. जिथे ते १६ व्या जी-२० शिखर परिषद आणि सीओपी-२६ च्या जागतिक नेत्यांच्या शिखर परिषदेत सहभागी होतील. पंतप्रधान २९-३१ ऑक्टोबर दरम्यान रोममध्ये असतील, जिथे ते  जी-२० शिखर परिषदेला उपस्थित राहतील. जी-२० शिखर परिषद साथीच्या रोगातून पुनर्प्राप्ती, जागतिक आरोग्य प्रणाली मजबूत करणे, आर्थिक पुनर्प्राप्ती, हवामान बदल, शाश्वत विकास आणि अन्न सुरक्षा यावर आहे.”

Narendra Modi, Karad, public meeting,
नरेंद्र मोदींची कराडमध्ये ३० एप्रिलला जाहीर सभा, उदयनराजेंच्या प्रचारार्थ आयोजन
BJP Manifesto PM Modi
गरीबांसाठी तीन कोटी घरे, मोफत रेशन योजना, घराघरांपर्यंत पाईपलाईनने गॅस; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्या मोठ्या घोषणा
PM Modi Ramtek Sabha
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर निशाणा; म्हणाले, “इंडिया आघाडीला त्यांच्या पापाची शिक्षा…”
Narendra Modi sanjay raut
“इस्रायली जनतेच्या उद्रेकाचे ‘आफ्टर शॉक्स’ भारतातही बसणार”, ठाकरे गटाचा पंतप्रधान मोदींना सूचक इशारा

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हॅटिकन येथे पोप फ्रान्सिस यांची भेट घेतील. मात्र, ही चर्चा शिष्टमंडळ पातळीवर होणार की एकट्याने होणार हे अद्याप ठरलेले नाही,असे हर्षवर्धन श्रृंगला म्हणाले.