पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असताना भाजपा नेते तथा केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अर्थात बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या घरी रात्रीचे जेवण केले. या जेवणाच्या कार्यक्रमानंतर वेगवेगळ्या चर्चांना तोंड फुटले आहे. सौरव गांगुली राजकारणात प्रवेश करणार का? असा प्रश्न विचारला जातोय. असे असताना आता सौरव गांगुली यांनी त्यांचे पश्चिम बंगलाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी असलेल्या मैत्रीवर भाष्य केलं आहे.

हेही वाचा >> ग्लेन मॅक्सवेलची कमाल! हैदराबादच्या सलामीवीरांना पहिल्याच षटकात शून्यावर केलं बाद

ममता बॅनर्जी या भाजपाच्या टीकाकार आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच अमित शाह यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांवर यापूर्वी टीका केलेली आहे. असे असताना शुक्रवारी अमित शाह यांच्यासोबत जेवण करुन गांगुली यांनी शनिवारी एका खासगी रुग्णालयाच्या उद्घाटन समारंभात “आपल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत. या संस्थेला मदत देण्यासाठी मी ममता बॅनर्जी यांच्याशी संपर्क साधला होता,” असे सांगितले.

हेही वाचा >> वनिंदू हसरंगा, फॅफ डू प्लेसिसने केली कमाल; बंगळुरुचा दणदणीत विजय, हैदराबादचा लाजिरवाणा पराभव

तसेच गांगुली यांनी कोलकाताचे महापौर फिरहाद हकीम यांचीदेखील प्रशंसा केली. “फिरहाद हकीम यांच्याशीही माझे जवळचे संबंध आहेत. मी पहिल्या वर्गात होतो, तेव्हापासून ते मला पाहत आले आहेत. ते आमचे कौटुंबिक मित्र आहेत. त्यांच्याशी जो संपर्क साधेल त्याला मदत मितळते. मीदेखील त्यांना अनेकवेळा फोन केलेला आहे,” असे गांगुली म्हणाले.

हेही वाचा >> दिल्ली कॅपिटल्ससमोर दुहेरी संकट,दिग्गज फलंदाज पृथ्वी शॉ पडला आजारी; केलं रुग्णालयात दाखल

अमित शाह यांनी गांगुली यांच्या घरी जाऊन भोजण केल्यानंतर वेगवेगळ्या चर्चा केल्या जात होत्या. त्यानंतर गांगुली यांनी त्यावर शुक्रवारी स्पष्टीकरण दिले होते. “अमित शाह भोजनासाठी आल्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र मी शाह यांना २००८ सालापासून ओळखतो. जेव्हा मी क्रिकेट खेळायचो तेव्हा मी त्यांना भेटलो होतो. यापेक्षा दुसरं काहीही नाही,” असं गांगुली म्हणाले होते.