संसदेवरील हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार अफजल गुरुला शनिवारी सकाळी तिहार तुरुंगात फाशी देण्यात आली. अफजल गुरुला न्यायालयाने दोषी ठरविण्यापासून ते त्याचा फाशीपर्यंतचा प्रवास असा घडला.घटनाक्रम१८ डिसेंबर २००२ - दिल्लीतील न्यायालयाने अफजल गुरुला संसदेवरील हल्ल्याप्रकरणी दोषी ठरविले. १३ डिसेंबर २००१ रोजी संसदेवर हल्ला करण्याचा कट अफजल गुरुनेच आखल्याचा आरोप सिद्ध होत असल्याचे न्यायालयाने आपल्या निकालपत्रात म्हटले. २९ ऑक्टोबर २००३ - दिल्ली उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. ४ ऑगस्ट २००५ - सर्वोच्च न्यायालयानेही दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय़ कायम ठेवला आणि अफजल गुरुची याचिका फेटाळली. २० ऑक्टोबर २००६ - या दिवशी अफजल गुरुला फाशी देण्यात येणार होती. मात्र, त्याच्या पत्नीने राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केल्यांतर फाशीच्या अमलबजावणीला स्थगिती देण्यात आली. २३ जानेवारी २०१३ - अफजल गुरुला फाशी देण्यात यावी, अशी शिफारस केंद्रीय गृह मंत्रालयाने राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे केली. २६ जानेवारी २०१३ - राष्ट्रपतींनी अफजल गुरुचा दयेचा अर्ज फेटाळला आणि फाशीची शिक्षा देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय़ कायम ठेवला.