पीटीआय, विंडहोक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नामिबियाच्या अध्यक्ष नेतुंबो नंदी-एतवाह यांच्याबरोबर बुधवारी चर्चा केली. त्यानंतर दोन्ही देशांत या वेळी चार करार झाले. आरोग्य आणि औषधे, नामिबियामध्ये उद्याोग केंद्राची स्थापना, जागतिक जैवइंधन आघाडीची चौकट याबाबत हे करार झाले.

डिजिटल तंत्रज्ञान, संरक्षण, कृषी, आरोग्य, शिक्षण, दुर्मीळ खनिजे अशा विविध क्षेत्रांत द्विस्तरावरील संबंध आणखी कसे मजबूत होतील, यावर मोदी आणि नंदी-एतवाह यांच्यात चर्चा झाली. मोदी यांच्या नामिबिया भेटीमुळे दोन्ही देशांचे संबंध अधिक मजबूत झाल्याचे सांगण्यात आले.

पंतप्रधान मोदी यांनी सामाजिक माध्यमावर पोस्ट टाकून या चर्चेची माहिती दिली. त्यांची नामिबियाला ही पहिली भेट असून, भारताच्या आतापर्यंतच्या तिसऱ्या पंतप्रधानांनी दिलेली ही भेट आहे.

मोदींना नामिबियाचा सर्वोच्च नागरी सन्मान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बुधवारी नामिबियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘ऑर्डर ऑफ द मोस्ट एन्शंट वेलविचया मरॅबिलिस’ प्रदान करण्यात आला. नामिबियाचे अध्यक्ष नेतुंबो नंदी एतवाह यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. पंतप्रधान मोदींना २०१४ पासून आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेला हा २७ वा पुरस्कार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतब्राझीलमध्ये सहा करार

ब्रासिलिया : भारत आणि ब्राझीलमध्ये मंगळवारी दोन्ही देशांतील व्यापार येत्या पाच वर्षांत दुप्पट (२० अब्ज अमेरिकी डॉलर) करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आणि सहा करार करण्यात आले. ऊर्जा, कृषी क्षेत्रासह विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्राझीलचे अध्यक्ष लुला यांच्या चर्चेनंतर विविध करार करण्यात आले.