Ahmedabad crash ६२ वर्षांच्या कांचन पटोलिया यांचा मुलगा अर्जुन याचा १२ जून रोजी झालेल्या विमान अपघातात त्याचा मृत्यू झाला. अर्जुन हा ब्रिटिश नागरिक होता त्याने तिथलं नागरिकत्व घेतलं होतं. गुजरातमध्ये तो आला होता कारण १८ दिवसांपूर्वीच त्याच्या पत्नीचा कर्करोगामुळे मृत्यू झाला. तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारांसाठी आणि इतर विधींसाठी अर्जुन गुजरातला आला होता. अर्जुन आणि भारती यांना ८ वर्षाची एक आणि चार वर्षांची एक अशा दोन मुली आहेत. आता त्या मुली पोरक्या झाल्या आहेत. या मुलींच्या भवितव्याची चिंता आम्हाला आहे असं कांचन यांनी सांगितलं.

कांचन पटोलिया यांनी काय सांगितलं?

मला प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. कारण अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात माझा मुलगा अर्जुन याचा मृत्यू झाला. त्याची पत्नी भारती २६ मे रोजी तिचा मृत्यू झाला. तिला अखेरचा निरोप देण्यासाठी अर्जुन आला होता. १२ जूनच्या विमानाने तो लंडनला चालला होता. १८ दिवसांपूर्वी दोन मुलींची आई गेली आता बाबा. रिया आणि किया या दोन्ही नाती पोरक्या झाल्या आहेत. अर्जुन माझ्या दुसऱ्या मुलाच्या घरी होता. त्याने भारतीच्या पार्थिवावर झालेल्या अंत्यसंस्कारानंतर तिच्या अस्थी नर्मदा नदीत विसर्जित केल्या होत्या. असं कांचन यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं.

१२ जून रोजी माझा मुलगा त्याच विमानाने लंडनला चालला होता-कांचन पटोलिया

कांचन पुढे म्हणाल्या, जेव्हा विमान अपघाताची बातमी आली तेव्हा माझ्या काळजात धस्स झालं. त्यानंतर डीएनएवरुन मृतदेहांची ओळख पटवली जाईल असं जाहीर करण्यात आलं. मी १२ जून रोजी माझ्या रक्ताचे नमुने डीएनए तपासणीसाठी दिले होते. त्यानंतर अर्जुनच्या मृतदेहाची ओळख पटली. अर्जुनचे अंत्यसंस्कार आणि इतर विधी पूर्ण झाल्यानंतर मी लंडनला जाणार आणि माझ्या दुसऱ्या मुलाकडे राहणार आहे. मलाच आता माझ्या नातींची काळजी घ्यावी लागणार आहे असं कांचन यांनी साश्रू नयनांनी सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पटोलिया कुटुंब मूळचं वाडिया या गावातलं होतं. बऱ्याच वर्षांपूर्वी ते सुरतला आले. कांचन यांचे पती आणि अर्जुनचे वडील गारमेंट शॉप चालवतात. अर्जुन हा गुरुकुल शाळेत जात असे. रमेश पटोलिया यांचं निधन काही वर्षांपूर्वी झालं. त्यानंतर या कुटुंबाला आर्थिक चणचण भासू लागली होती. अर्जुन उच्च शिक्षण घेऊन लंडनला गेला आणि तिथेच स्थायिक झाला. १७ वर्षांपासून अर्जुन लंडनमध्ये वास्तव्य करत होता त्याला ब्रिटिश नागरिकत्वही मिळालं होतं. त्यानंतर अर्जुनचा भाऊ गोपाल हा देखील लंडनला स्थायिक झाला. सुरतमध्ये असताना त्याचं लग्न झालं. त्यानंतर २०२३ मध्ये तो लंडनला स्थायिक झाला होता. आता दोन लहान मुलींनी २७ मे रोजी आई गमावली तर त्यानंतर १८ दिवसांनी बाबा त्यामुळे पटोलिया कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.