एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मुस्लिमांचा वापर करणाऱ्या राजकीय पक्षांवर निशाणा साधला आहे. मुस्लिमांची अवस्था लग्नाच्या वरातीतल्या ‘बँड बाजा पार्टी’सारखी झाली असल्याचं ओवेसी यांनी म्हटलं आहे. उत्तर प्रदेशातील कानपूर येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना ओवेसी यांनी खंत व्यक्त करताना प्रत्येक जातीकडे त्यांचा नेता आहे. मात्र मुस्लिमांकडे नाही असंही म्हटलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा


“मुस्लिमांची अवस्था लग्नाच्या वरातीमधील बँड बाजा पार्टीसारखी झाली आहे, जिथे त्यांना (मुस्लिमांना) आधी संगीत वाजवायला सांगितलं जातं आणि लग्नाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर बाहेर उभं केलं जातं.” असं ओवेसी यांनी यावेळी म्हटलं.


पुढे ते म्हणाले की, “आता मुस्लीम वाद्य वाजवणार नाहीत. प्रत्येक जातीकडेही त्यांचा नेता आहे, मात्र मुस्लिमांकडे त्यांचा नेता नाही. उत्तर प्रदेशात १९ टक्के मुस्लीम लोकसंख्या आहे, मात्र एकही नेता नाही”.


ओवेसी यांनी यावेळी सीएएविरोधात करण्यात आलेल्या आंदोलनांचा उल्लेख करताना यावेळी सीएए आणि एनआरसीविरोधात आंदोलन करताना मृत्यू झालेले शहीद असल्याचं म्हटलं. “ज्यांनी त्या लोकांना मारले ते सर्व नष्ट होवोत,” असं यावेळी त्यांनी म्हटलं.

आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी ओवेसी यांनी अयोध्येतून प्रचार मोहिमेला सुरुवात केली असून अनेक सभा घेतल्या आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत ४०३ जागांपैकी १०० ठिकाणी आपले उमेदवार असतील अशी घोषणा ओवेसी यांनी केली आहे. राज्यातील ८२ असे मतदारसंघ आहेत जिथे मुस्लीम मतदारांची संख्या जास्त असून उमेदवारांचं भवितव्य ठरवू शकतात.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aimim asaduddin owaisi says condition of muslims has become like a band baja party in a marriage procession sgy
First published on: 27-09-2021 at 08:51 IST