गेल्या काही महिन्यांपासून कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात मशीदीवरील भोंगे आणि अजानच्या मुद्द्यावरून वाद सुरू आहे. दरम्यान, आता एआयएमआयएमचे उत्तर प्रदेशचे अध्यक्ष शौकत अली यांनी अजानला विरोध करणारे राक्षस आहेत, असे वादग्रस्त विधान केले आहे. यावरून आता पुन्हा एकदा वाद होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवर तालिबानी सैन्याकडून अंदाधुंद गोळीबार; सहा पाकिस्तानी नागरिकांचा मृत्यू, १७ जखमी

bombay high court nitesh rane speech examine
मीरा-भाईंदर हिंसाचार प्रकरण : नितेश राणेंसह दोन भाजपा नेत्यांची भाषणं तपासण्याचे कोर्टाचे आदेश
Mayawati will start BSPs campaign in Maharashtra from Nagpur
बसपाच्या महाराष्ट्रातील प्रचाराचे रणशिंग मायावती नागपुरातून फुंकणार
25 prominent politicians joined BJP
आधी भ्रष्टाचाराच्या आरोपांनी ‘कलंकित’; भाजपमध्ये येताच ‘चकचकीत’
Bhiwandi lok sabha
महाविकास आघाडीत भिवंडीची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला ?

शौकत अलींचे वादग्रस्त विधान

सीएनएन न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तानुसार, उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये एमआयएमच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना एआयएमआयएमचे उत्तर प्रदेशचे अध्यक्ष शौकत अली यांनी मशीदीवरील भोंगे आणि अजानच्या मुद्द्यावरून बोलताना वादग्रस्त विधान केले. कावड यात्रेदरम्यान अनेक मुस्लीम बांधवांनी हिंदू बांधवांची सेवा केली. त्यावेळी जागोजागी रस्ते अडवण्यात आले होते. आम्ही त्यावर आक्षेप घेतला नाही. कारण ते आपले बांधव आहे. तो त्यांच्या आस्थेचा विषय आहे. मात्र, काही लोकं लोकं सकाळाच्या अजानला, मशीदीवरील भोंग्यांना विरोध करत आहेत. जर आम्ही कावड यात्रेवर आक्षेप घेत नाही, तर आमच्या अजानला का विरोधत केला जातो? जे लोकं याला विरोध करत आहेत, ते राक्षस आहेत, असे ते म्हणाले.

हेही वाचा – FIFA World Cup मध्ये नवा वाद! ‘या’ देशाच्या खेळाडूंनी मैदानावर फडकवला पॅलेस्टाइनचा झेंडा; विजयानंतर ‘फ्री पॅलेस्टाइन’ची मागणी

भाजपाची एमआयएमवर टीका

दरम्यान, भाजपाने यावरून एआयएमआयएमवर टीका केली आहे. एमआयएमचे नेते राजकीय फायद्यासाठी जाणीवपूर्वक अशी वादग्रस्त विधाने करत आहेत. हिंदू-मुस्लीमांमध्ये वाद निर्माण करून मतांचे दृवीकरण्याचा एआयएमआयएमचा प्रयत्न आहेत, असा आरोप भाजपाने केला आहे.