गेल्या काही दिवसांपासून ज्ञानवापी मशीद प्रकरणावरून देशातील राजकीय वातावरण तापलं आहे. अलीकडेच ज्ञानवापी मशिदीत केलेल्या सर्वेक्षणामध्ये शिवलिंग आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. असं असताना AIMIM चे प्रवक्ते दानिश कुरेशी यांनी शिवलिंगाबाबत आक्षेपार्ह ट्वीट केलं आहे. संबंधित ट्विटमधून त्यांनी हिंदू देवतांचा अपमान केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर सायबर पोलिसांनी दानिश कुरेशीला शाहपूर येथून अटक केली आहे. पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याप्रकरणी अधिक माहिती देताना सहाय्यक पोलीस आयुक्त जेएम यादव यांनी सांगितलं की, दानिश कुरेशी नावाच्या ट्विटर हॅंडलवरून आक्षेपार्ह ट्वीट करण्यात आलं होतं. यामधून बहुसंख्याक लोकांच्या धार्मिक भावना दुखवल्या होत्या. त्यानंतर पोलीस पथकानं तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करत दानिश कुरेशी याला अटक केली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aimim spokesperson danish qureshi controversial statement about shivlinga arrested by cyber police rmm
First published on: 18-05-2022 at 19:07 IST