एअर कॅनडाचे अ-३२० जातीचे प्रवासी विमान रविवारी नोव्हा स्कॉशियातील हॅलिफॅक्स येथील विमानतळावर उतरल्यानंतर धावपट्टीवरून घसरले. त्यात २३ जण जखमी झाले.
एअर कॅनडाचे टोरंटोहून हॅलिफॅक्सला जाणारे विमान स्टॅनफिल्ड आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताच स्थानिक प्रमाणवेळेनुसार १२.४३ वाजता धावपट्टीवरून घसरले. कंपनीने त्याची ट्विटरवरून माहिती दिली. मात्र त्यात अपघाताचे कारण नमूद केले नाही. शहरात हिमवृष्टी झाल्याने दृश्यमानता कमी होती. त्यामुळे ही घटना घडली असल्याचा अंदाज आहे. या वेळी विमानात १३३ प्रवासी आणि ५ कर्मचारी होते

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Air canada ac624 crash lands in halifax
First published on: 30-03-2015 at 02:15 IST