Air India News : इस्रायल आणि इराणमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने तेल अवीवला जाणारी सर्व उड्डाणे ८ ऑगस्टपर्यंत रद्द केली आहेत. त्यामुळे इस्रायल आणि इराण तणावाचा परिणाम भारतातही दिसून आला आहे. एअर इंडियाने शुक्रवारी यासंदर्भात एक निवेदन जारी करत माहिती दिली आहे. तसेच प्रवाशांच्या सुरक्षेला आम्ही प्रथम प्राधान्य देतो, असं एअर इंडियाने म्हटलं आहे.

एअर इंडियाने निवेदनात म्हटलं की, “मध्य पूर्वेतीमधील काही भागांमध्ये असलेली तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेता, आम्ही तेल अवीवकडे जाणाऱ्या आमच्या सर्व फ्लाइटचे नियोजित ८ ऑगस्ट २०२४ पर्यंत रद्द केले आहेत. आम्ही परिस्थितीचे निरीक्षण करत आहोत. कारण प्रवासी आणि क्रू मेंबर्सची सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे.”

हेही वाचा : Canada : कॅनडात स्थलांतरविरोधी भावना का वाढल्या? भारतीय आणि शीख समुदायांना का केलं जातं आहे लक्ष्य? सर्वेक्षणातून माहिती समोर

“तसेच आम्ही सतत परिस्थितीचे निरीक्षण करत आहोत. या या कालावधीमध्ये तेल अवीव आणि तेथून प्रवासासाठी बुकिंगसह आमच्या प्रवाशांना पुन्हा शेड्युलिंग आणि रद्दीकरण शुल्कावर एक वेळ माफी देऊन पाठिंबा देत आहोत. आमच्या प्रवाशांची आणि क्रूची सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे. या फ्लाइट्सच्या प्रवासांसाठी बुकिंग निश्चित केलेल्या प्रवाशांना, पुनर्निर्धारित आणि रद्द करण्याच्या शुल्कावर माफी दिली जाईल. तसेच झालेल्या गैरसोयीबद्दल मनापासून दिलगीरी व्यक्त करतो”, असंही एअर इंडियाने म्हटलं आहे.

इस्माइल आणि इराणमध्ये तणाव का?

हमासचा राजकीय प्रमुख इस्माइल हनियेची इराणच्या तेहरानमध्ये ३१ जुलै रोजी हत्या झाली. इस्माइल हनियेची ही हत्या इस्रायलने केल्याचा आरोप हमास आणि इराणकडून करण्यात येत आहे. मात्र, याबाबत इस्रायलने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे इस्माइल हनियेच्या हत्येचा बदला घेण्यासाठी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी इस्रायलवर हल्ला करण्याचे आदेश दिल्याचे वृत्त समोर आलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इस्माइल हनियेच्या मृत्यूची अधिकृत घोषणा झाल्यानंतर इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या तातडीच्या बैठकीत हा आदेश जारी केला गेल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे इस्रायल आणि इराण तणमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून आता भारतातून तेल अवीवला जाणारी एअर इंडियाची सर्व विमाने ८ ऑगस्टपर्यंत रद्द करण्यात आली असल्याची माहिती कंपनीकडून देण्याती आली आहे.