रशिया आणि युक्रेनमधील वाद रोज चिघळत आहे. त्यामुळे युक्रेनध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करीत आहेत. याचाच एक भाग म्हणून मंगळवारी एअर इंडियाचे विमान युक्रेनला पाठवण्यात आले होते. हे विमान २४२ जणांना घेऊन देशात परतले आहे. युक्रेनहून दिल्लीत परतलेल्या या विद्यार्थ्यांनी तिथल्या तणावपूर्ण परिस्थितीचे अनुभव शेअर केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

युक्रेनच्या संकटात दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर युक्रेनमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमाचं शिक्षण घेत असलेल्या एका भारतीय विद्यार्थ्याने सांगितले की, “मायदेशी परतून आता निवांत वाटत आहे.” तर, युक्रेनमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत असलेला विद्यार्थी क्रिश राज म्हणाला, “मी युक्रेनमध्ये सीमावर्ती भागापासून लांब राहत होतो त्यामुळे तेथील परिस्थिती सामान्य होती, भारतीय दूतावासाने जारी केलेल्या निवेदनानंतर मी परत आलो.”

आणखी एक विद्यार्थी सांगतो की, “युक्रेनमधील परिस्थिती सामान्य आहे. कॉलेजने आम्हाला परत येण्यास सांगितले नाही. अनेक मीडिया रिपोर्ट्समुळे दहशत निर्माण झाली होती. तसेच तिथे आमच्या अभ्यासावर परिणाम होत होता. त्यामुळे मी परत आलो.” तर, युक्रेनमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत असलेल्या शिवम चौधरीने दिल्ली विमानतळावर सांगितले की, “सध्या तिथली परिस्थिती शांततापूर्ण आहे, परंतु तणाव निर्माण होत असल्याचे दिसत आहे. मला घरी परतल्यानंतर चांगले वाटत आहे.”

युक्रेनमध्ये महाराष्ट्रातील बाराशे विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला ; केंद्र व राज्य सरकारला मदतीसाठी साकडे

“रशिया आणि युक्रेनमधील वाढत्या तणावादरम्यान मायदेशात परत आल्याने आनंद झाला आहे. आता तिथे परिस्थिती सामान्य आहे, पण पालक चिंतेत असल्याने मी परत आले,” असे एका भारतीय विद्यार्थीनीने दिल्लीत उतरल्यानंतर सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Air india special flight carrying around 242 passengers from ukraine reaches delhi amid russia conflict hrc
First published on: 23-02-2022 at 10:20 IST