ट्विन ऑटर नावाचे नेपाळ एअरलाइन्सचे छोटे प्रवासी विमान रविवारी दुपारपासून बेपत्ता झाले आहे. यात एकूण १८ प्रवासी आहेत. त्यापैकी एक परदेशी नागरिक आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पश्चिम नेपाळमधील पर्यटनस्थळाजवळील पोखरा विमानतळावरून ट्विन ऑटर या विमानाने दुपारी १२.४० वाजता उड्डाण केले. त्यानंतर ३५ मिनिटांच्या कालावधीनंतर हे विमान बेपत्ता झाले. अद्याप ते विमान गायब असल्याची माहिती नेपाळ एअरलाइन्स कॉपरेरेशनचे प्रवक्ते राम हरी शर्मा यांनी दिली. या विमानात एक डॅनिश नागरिक, एक लहान मूल, १८ लोक, वैमानिक आणि दोन विमान कर्मचारी आहेत. प्रवाशांपैकी कुणाचीही माहिती प्राप्त झालेली नाही, असे सांगण्यात आले.
या विमानाचा शोध घेण्यासाठी हेलिकॉप्टर रवाना करण्यात आले आहे.