दिल्लीतील काँग्रेसचे नेते अजय माकन यांनी मंगळवारी दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याचे सांगितले जाते. मात्र, काँग्रेसने हे वृत्त फेटाळून लावले. माकन यांनी राजीनामा दिलेला नाही. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते परदेशात उपचारासाठी गेले आहेत, असे काँग्रेसने म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजय माकन यांनी गेल्या महिन्यातच पक्षनेतृत्वाला राजीनाम्याची कल्पना दिली होती. त्यांनी दिल्लीतील प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा पक्षनेतृत्वाकडे सोपवल्याचे वृत्त मंगळवारी सकाळी समोर आले. अजय माकन यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजीनामा दिल्याची चर्चा आहे. सध्या ते उपचारासाठी परदेशात रवाना झाले आहेत.

५४ वर्षीय अजय माकन यांनी तीन वर्षांपूर्वी दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षपादाचा कार्यभार स्वीकारला होता. अरविंदर सिंग लवली यांनी राजीनामा दिल्यानंतर पक्षाने अजय माकन यांच्याकडे दिल्लीची धूरा सोपवली होती. विधानसभा निवडणुकीत पक्षाला चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्यावेळीही अजय माकन यांनी राजीनामा दिला होता. मात्र, पक्षनेतृत्वाने त्यांचा राजीनामा स्वीकारला नव्हता. लोकसभा निवडणूकजवळ असतानाच माकन यांनी राजीनामा दिल्यास दिल्ली काँग्रेसला मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajay maken resigned from delhi congress president post citing health reasons
First published on: 18-09-2018 at 08:51 IST