सोशल मीडिया कंपनी मेटाचे भारताचे प्रमुख अजित मोहन यांनी आज अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ते सोशल मीडिया कंपनी स्नॅपचॅटमध्ये मध्ये रूजू होणार असल्याची माहिती आहे. अजित मोहन हे जानेवारी २०१९ मध्ये फेसबूक इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून रुजू झाले होते. त्यापूर्वी त्यांनी हॉटस्टारचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून चार वर्षे काम पाहिले.
हेही वाचा – Firing At Imran Khan: दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना संपल्या संपल्या बाबर आझमची पोस्ट; म्हणाला, “हा हल्ला…”
अजित मोहन यांच्या राजीनाम्याबाबत मेटा ग्रुपचे उपाध्यक्ष निकोला मेंडेलसोहन यांनी प्रतिक्रिया दिली. “अजित मोहन यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या चार वर्षांत त्यांनी भारतात कंपनीच्या वाढीसाठी महत्त्वाचं योगदन दिले आहे. त्यांच्या या योगदानाबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. त्यांना भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा!”, असे ते म्हणाले.
हेही वाचा – Firing at Imran Khans Rally : गोळीबारात जखमी झाल्यानंतर इम्रान खान यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
दरम्यान, “मला हे सांगताना आनंद होत आहे की अजित मोहन स्नॅपमध्ये एपीएसीचे अध्यक्ष म्हणून फेब्रुवारीमध्ये रुजू होणार आहेत. यापूर्वी त्यांनी मेटाचे भारताचे प्रमुख म्हणून काम पाहिले आहे”, अशी प्रतिक्रिया स्नॅपचे सीईओ इव्हान स्पीगल यांनी दिली आहे.