सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात दिल्लीमधील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये उडालेल्या धुमश्चक्रीनंतर रविवारी हिंसाचार उफाळून आला होता. या आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात शिरून विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला. या घटनेचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. यातील एका व्हिडिओला अभिनेता अक्षय कुमारने लाईक केले होते. त्यावरुन अनेकांनी अक्षय कुमारवर टीकेची झोड उठविली. यात चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपनेदेखील अक्षयचा समाचार घेतला आहे.

नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाविरोधात रविवारी दिल्लीतील जामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी रविवारी आंदोलन केलं. यावेळी विद्यार्थी आणि पोलिसांत शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. त्यानंतर रात्री पोलिसांनी विद्यापीठात घुसून विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला. शिवाय पोलिसांनी काही निदर्शकांना देखील ताब्यात घेतले होते. या सर्व घटनांचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले. त्यापैकी एका व्हिडिओमध्ये पोलीस विद्यार्थ्यांना मारहाण करताना दिसत आहे. हाच व्हिडिओ अक्षय कुमारने लाईक केला होता. ही बाब नेटकऱ्यांच्या लक्षात आली आणि त्याचा स्क्रीनशॉर्ट व्हायरल होऊ लागला. त्यानंतर सोशल मीडियावर अक्षयला मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आलं.


यामध्ये एका नेटकऱ्याने “मला अक्षय कुमारविषयी प्रचंड आदर आहे. कणा नसताना मार्शियल आर्टसची ट्रेनिंग घेणं खूप कठीण असत,” अस म्हटलं होतं. अप्रत्यक्षरित्या अक्षयच्या ‘स्वाभिमानाचा कणा मोडला आहे’, असं म्हणतं त्याच्यावर टीका केली होती. तसंच त्याने हे ट्विट अनुराग कश्यपला टॅग केलं. “यावर तुम्हाला काय वाटतं?” असा प्रश्न त्याने अनुरागला विचारला. नेटकऱ्याने प्रश्न विचारल्यानंतर अनुराग कश्यपने रिट्विट करत तुझ्या मताशी सहमत असल्याचं म्हटलं.

दरम्यान, अक्षयने व्हिडीओ लाईक केल्यानंतर त्याने जाहीरपणे माफी मागत चुकून हा व्हिडीओ लाईक केल्याचं सांगितलं. मात्र त्याच्यावरील सूर काही झालेला नाही