पुरी येथील सुप्रसिद्ध जगन्नाथ मंदिरात सर्वधर्मीयांना प्रवेश द्यावा, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. हिंदुत्व दुसऱ्यांच्या आस्थेला धक्का पोहोचवण्यास सांगत नाही. तसेच हिंदू धर्म हा दुसऱ्या धर्मात अडथळा आणत नाही, असेही कोर्टाने म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जगन्नाथ मंदिराच्या आवारातील गैरव्यवहार आणि सेवकांकडून भाविकांना दिली जाणारी वागणूक यासंदर्भात सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल झाली आहे. गुरुवारी या याचिकेवर सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान एका विशिष्ट धर्माला मानणाऱ्या व्यक्तीला मंदिरात प्रवेश देता येईल का, असा प्रश्न उपस्थित झाला होता. जगन्नाथ पुरी मंदिरात फक्त हिंदूंनाच प्रवेश दिला जातो. यावर सुप्रीम कोर्टाने मंदिर व्यवस्थापन समितीला निर्देश दिले. मंदिरात सर्व धर्मीयांना प्रवेश दिला पाहिजे. पण हा आमचा निर्णय नाही. मंदिर प्रशासनाने याबाबत विचार करावा, असे कोर्टाने नमूद केले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Allow entry to all non hindus at puri jagannath temple suggest supreme court
First published on: 06-07-2018 at 09:48 IST