ऑनलाईन शॉपिंगच्या क्षेत्र वेगाने विस्तारत असताना आता अधिकाधिक ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या कल्पना लढविण्यात येत आहेत. या वेगळेपणाचे पुढील पाऊल म्हणजे अॅमेझॉन प्राईम. तुम्ही विचाराल आता हे अॅमेझॉन प्राईम म्हणजे काय? तर अॅमेझॉननेच अगदी नेमकेपणाने ही नवी योजना म्हणजे नेमके काय, हे समजावून सांगितले आहे. अॅमेझॉनवरील खरेदी + मोफत आणि वेगात डिलिव्हरी म्हणजे ‘अॅमेझॉन प्राईम’.
ऑनलाईन शॉपिंगच्या क्षेत्रात उत्पादनाची डिलिव्हरी किती वेगाने होऊ शकते आणि त्यासाठी किती पैसे मोजावे लागतात, यावर बरंच काही अवलंबून असते. त्यामुळे यावर उत्तर म्हणून अॅमेझॉनने ही नवी योजना आणली आहे. अॅमेझॉनवरील वस्तू अॅमेझॉन प्राईमच्या ग्राहकांनी खरेदी केल्यावर त्या त्यांना वेगाने आणि मोफत वितरित केल्या जाणार आहेत. सध्या ठरावीक वस्तूच या पद्धतीने उपलब्ध होतील. ज्या वस्तू अॅमेझॉन प्राईमवर उपलब्ध आहेत. त्यावर तसा लोगोही लावण्यात आलेला असेल. जेणेकरून ग्राहकांना ते समजण्यास मदत होईल. वस्तूची ऑर्डर दिल्यावर एक किंवा दोन दिवसांत ती ग्राहकांच्या दारात पोहोचविण्यात येणार आहे. या योजनेचे आणखी वेगळेपण म्हणजे अॅमेझॉन प्राईमच्या ग्राहकांसाठी काही वस्तूंवरील ऑफर्स इतरांपेक्षा ३० मिनिटे आधीच उपलब्ध करून देण्यात येतील. ज्यामुळे ती वस्तू ऑऊट ऑफ स्टॉक होण्यापूर्वीच ग्राहकांना किमी किंमतीत खरेदी करता येईल.
अॅमेझॉन प्राईमचे सदस्यत्व ग्राहकांना घ्यावे लागणार असून, त्यासाठी वर्षाला ४९९ रुपये मोजावे लागतील. सध्या ६० दिवसांची फ्री ट्रायलही कंपनीने उपलब्ध करून दिली आहे. त्याचबरोबर ज्या ग्राहकांना सकाळच्या वेळीच डिलिव्हरी हवी असेल, त्यांच्यासाठी थोडे अधिक शुल्क मोजून ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सध्या भारतातील २० शहरांमध्येच ही सुविधा उपलब्ध असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amazon prime comes to india
First published on: 26-07-2016 at 11:01 IST