पीटीआय, वॉशिंग्टन
‘अंधारमय अशा चीनसमोर अमेरिकेने भारत आणि रशियाला गमावले असल्यासारखे वाटत आहे. या सर्वांना दीर्घ आणि समृद्धीचे भविष्य लाभो,’ अशी उपरोधिक टिप्पणी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ट्रूथ सोशल’वर केली. समाज माध्यमावर संदेश प्रसृत टाकून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. दरम्यान, भारत-अमेरिकेतील संबंध आणखी रसातळाला गेल्याचे चित्र यामुळे निर्माण झाले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची शांघाय सहकार्य संघटनेच्या पार्श्वभूमीवर भेट झाली. तिघांमधील जवळीक अमेरिकेला खटकणारी ठरली आहे. रशियातून भारत तेलखरेदी करीत असल्याच्या कारणावरून आयातशुल्कात वाढ आणि भारताच्या कर धोरणावर अमेरिका सातत्याने टीका करीत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प, त्यांचे व्यापार सल्लागार पीटर नव्हारो भारतावर बोचरी टीका करीत आहेत.