Mexico Shooting News : मेक्सिकोमधील सॅन मिग्यूएल टोटोलपॅन या भागात गोळीबाराची घटना घडली आहे. या भीषण हल्ल्यात एकूण १८ जणांचा मृत्यू झाला असून ३ जण जखमी झाले आहेत. या घटनेत मेक्सिकोचे महापौर कॉनरॅडो मेंडोझा यांच्यासह त्यांच्या वडिलांचाही यामध्ये मृत्यू झाला आहे.

मेक्सिकोमधील सॅन मिग्यूएल टोटोलपॅन येथील सिटी हॉल परिसरात झालेल्या या गोळीबारानंतर एकच खळबळ उडाली असून लॉस टेक्विलेरोस या गुन्हेगारी टोळीने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. या टोळीच्या सदस्यांनी तसा व्हिडीओ समाजमाध्यमावर प्रदर्शित केला आहे. मात्र येथील स्थानिक अधिकाऱ्यांनी हा हल्ला कोणी केला, हे अद्याप सांगता येणार नाही, असे सांगितले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सशस्त्र मारेकऱ्यांनी सॅन मिग्यूएल टोटोलपॅन शहरातील सिटी हॉल परिसरात गोळीबार केला. समाजमाध्यमांवर या हल्ल्याचे काही व्हिडीओ समोर आले आहेत. यामध्ये मृत्युमुखी पडलेले नागरिक तसेच गोळीबारामुळे भिंतींची झालेली दुर्दशा स्पष्टपणे दिसत आहे. या हल्ल्यात महापौर, माजी महापौर, काही पोलीस अधिकार तसेच सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हल्ल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचण्यास उशीर व्हावा म्हणून हल्लेखोरांच्या साथीदारांनी रस्त्यात वाहने उभी केली होती.