अमेरिकेच्या राष्ट्रीय पायाभूत सुविधा सल्लागार परिषदेवर (NIAC)  दोन भारतीय वंशांच्या नागरिकांची नियुक्ती करण्यात आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी ही घोषणा केली आहे. मनू अस्थाना आणि मधू बेरिवाल अशी या भारतीय वंशाच्या अधिकाऱ्यांची नावं आहेत. देशातील पायाभूत क्षेत्राची सुरक्षा आणि संभावित सायबर धोक्यापासून बचावासाठी या परिषदेकडून व्हाईट हाऊसला मार्गदर्शन करण्यात येते.

शीनजियांगमध्ये अल्पसंख्यांकाचा अतोनात छळ, संयुक्त राष्ट्राच्या अहवालात उघड, चीनने आरोप फेटाळले

या परिषदेसाठी बँकिंग, वित्त, वाहतूक, ऊर्जा, पाणी, धरणे, संरक्षण, दळणवळण, माहिती तंत्रज्ञान, आरोग्य सेवा, अन्न आणि कृषी, सरकारी सुविधा यासह विविध क्षेत्रातील सखोल अनुभव असलेल्या २६ वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावं या परिषदेसाठी घोषित करण्यात आली आहेत.

नरेंद्र मोदींनी पूर संकटावर केलेल्या ट्विटला पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी दिलं उत्तर; म्हणाले…

मनू अस्थाना उत्तर अमेरिकेतील जगातील सर्वात मोठ्या पॉवर ग्रीडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पीजेएमचे(PJM) अध्यक्ष आहेत. अस्थाना यांच्या नेतृत्वात स्वच्छ आणि अधिक कार्यक्षम वीज पुरवठा होत असल्याचे व्हाईट हाऊसने म्हटले आहे. अस्थाना यांना ऊर्जा निर्मिती क्षेत्रासोबतच नैसर्गिक वायू व्यापार आणि जोखिम व्यवस्थापन क्षेत्रात दांडगा अनुभव आहे. अस्थाना हे ‘इलेक्ट्रिसीटी सबसेक्टर कोऑर्डिनेटिंग काऊंन्सिल’चे सदस्य आहेत. टेक्सास बाल रुग्णालयाच्या विश्वस्त मंडळावर देखील ते कार्यरत आहेत.

पोर्तुगालमध्ये गर्भवती भारतीय महिलेच्या मृत्यूनंतर खळबळ; सर्वात मोठ्या रुग्णालयात मिळाला नाही प्रवेश, आरोग्यमंत्र्यांचा राजीनामा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सल्लागार परिषदेवरील भारतीय वंशांच्या मधू बेरिवाल यांनी १९८५ साली ‘इनोव्हेटिव्ह इमॅरजन्सी मॅनेजमेंट’ (IEM) या संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष म्हणून त्या कार्यरत आहेत. अमेरिकेत सुरक्षा आणि आपत्कालीन व्यवस्थापन क्षेत्रात महिलांच्या नेतृत्वाखालील ही सर्वात मोठी संस्था आहे. गेल्या ३७ वर्षांपासून बेरिवाल या क्षेत्रात कार्यरत आहेत.