गुजरातमध्ये भाजपाचा विजय निश्चित झाला आहे. यंदा भाजपाने १५० पेक्षा जास्त जागा जिंकत विक्रमी विजय मिळवला आहे. दरम्यान गुजरातमधील भाजपाच्या या दणदणीत विजयानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. पोकळ आश्‍वासने आणि सांप्रदायिक राजकारण करणाऱ्यांना गुजरातने नाकारले आहे, असे ते म्हणाले. तसेच त्यांनी या विजयानंतर गुजरातच्या जनतेचे आभारही मानले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – Gujarat Election Results 2022 Live: गुजरातमधील विजयानंतर अमित शाह यांचं ट्वीट, म्हणाले “इतिहास घडला आहे, सर्व विक्रम…”; वाचा प्रत्येक अपडेट

काय म्हणाले अमित शाह?

“गुजरातने नेहमीच इतिहास घडवण्याचे काम केले आहे. गेल्या दोन दशकात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाने गुजरातमध्ये विकासाचे सर्व विक्रम मोडीत काढले आणि आज गुजरातच्या जनतेने भाजपाला आशीर्वाद देत विजयाचे सर्व विक्रम मोडीत काढले”, असं ट्वीट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे.

विरोधकांवरही साधला निशाणा

“पोकळ आश्‍वासने, रेवडी वाटप आणि तुष्टीकरणाचे राजकारण करणाऱ्यांना गुजरातच्या जनतेने नाकारले आहे. तसेच विकासाचे राजकारण करणाऱ्यांना पंतप्रधान मोदींच्या भाजपाला अभूतपूर्व जनादेश दिला आहे. या विजयानंतर महिला, तरुण, शेतकरी पुन्हा एकदा भाजपाच्या पाठिशी आहेत, हे पुन्हा सिद्ध झाले आहे”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – Gujarat Election Results 2022 : जोरदार प्रचार, तगडी यंत्रणा अन् पुन्हा मोदी फॅक्टर; भाजपाच्या विक्रमी कामगिरीचे कारण काय?

गुजरातमधील जनतेचे मानले आभार

या विजयानंतर त्यांनी गुजरातच्या जनतेचीही आभार मानले. “या ऐतिहासिक विजयाबद्दल मी गुजरातच्या जनतेला आभार मानतो. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गुजरात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील, आणि गुजरातमधील भाजपा कार्यकर्त्यांचे आभार मानतो”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amit shah first reaction after victory in gujarat election results 2022 spb
First published on: 08-12-2022 at 15:12 IST