अमित शाह यांची ऑनलाइन सभा; भाजपा बिहार निवडणुकीचे रणशिंग फुंकणार!

यूट्युब, फेसबुक लाईव्ह आणि नमो अ‍ॅपच्या माध्यमातून पदाधिकारी कार्यकर्ते मार्गदर्शन ऐकणार

संग्रहित छायाचित्र

बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी भाजपाने तयारी सुरू केल्याचे दिसत आहे. केंद्रीय गृहमंत्री व माजी भाजपा अध्यक्ष अमित शाह आज(रविवार) या पार्श्वभूमीवर ७२ हजार बुथच्या माध्यमातून  व्हर्च्युअल रॅलीद्वारे भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ऑनलाइन मार्गदर्शन करणार आहेत.

जवळपास पाच लाख भाजपा कार्यकर्ते शाह यांचे मार्गदर्शन यूट्युब, फेसबुक लाईव्ह आणि नमो अ‍ॅपच्या माध्यमातून ऐकतील, असा भाजपाकडून दावा करण्यात आला आहे. आगामी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात येथील विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या अनुषंगाने भाजपा या ऑनलाइन मेळाव्यातून एकप्रकारे निवडणुकीचे रणशिंगच फुंकणार असल्याचे बोलले जात आहे. भापजाकडून हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहे.

देशावर करोनाचे संकट ओढावलेले असताना व राज्यात करोनाचे रुग्ण वाढत असताना भाजपाला मात्र निवडणुकीतच जास्त रस असल्याचा आरोप काँग्रेससह विरोधी पक्षाकडून करण्यात आलेला आहे. शनिवारी सायंकाळपर्यंत राज्यात ४ हजार ५०० करोनाबाधित रुग्ण असल्याची नोंद झालेली आहे.

बिहार भाजपाचे अध्यक्ष डॉ. संजय जयस्वाल म्हणाले, शाह यांची व्हर्च्युअल रॅली ही कार्यकर्त्यांना डिजिटली मार्गदर्शन करण्याचा मार्ग आहे. तर भाजपा प्रवक्ते निखील आनंद यांनी सांगितले की, रविवारी होणारी व्हर्च्युअल रॅली ही कार्यकर्त्यांना बुथपर्यंत पोहचवण्यासाठी दोन महिन्यांपासून आम्ही करत असलेल्या प्रयत्नांची पराकाष्ठा असेल. बिहार भाजापमध्ये संघटनात्म संरचनेत ४५ संघटनात्मक जिल्ह्ये, १ हजार १०० मंडळ, ९ हजार शक्ती केंद्र आणि ७२ हजार बुथ यांचा समावेश आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Amit shahs virtual rally today bjp will blow the trumpet of bihar elections msr

ताज्या बातम्या