Andhra Ministers Brother Arrested after he Slaps Cop At Temple Video : आंध्रप्रदेशातून एक अतिशय धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. आंध्र प्रदेशचे मंत्री बीसी जनार्दन रेड्डी यांनी एका पोलीस कॉन्स्टेबलला सार्वजनिक ठिकाणी कानशिलात लगावली आहे. या व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. ही धटना नांद्याल जिल्ह्यातील कोलिमिगुंडला (Kolimigundla) मंदिरात घडल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसारष जसवंत हे पोलीस कॉन्स्टेबल मंदिरात तैनात होते. त्यांनी मंत्र्याचा भाऊ बीसी मदन भूपाल रेड्डी याला प्रवेश करण्यास बंदी असलेल्या ठिकाणी जाण्यापासून रोखले. यावेळी दोघांमध्ये वाद झाला आणि या वाद वाढत जाऊन मदन रेड्डी याने त्या पोलीस कर्मचाऱ्याला मागे ढकलत त्याच्या कानशिलात लगावली. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

दरम्यान हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून लोक यावर भरभरून कमेंट करत आहेत. इतकेच नाही तर रेड्डी याला अटक देखील करण्यात आली आहे. एनडीटीव्हीने यासंबंधिचे वृत्त दिले आहे.

वायएसआर काँग्रेस पक्षाने (YSRCP) हे टीडीपीचे नेते आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून केले जाणारे अहंकार आणि अराजकतेचे उघड प्रदर्शन असल्याचे म्हटले आहे. एक्सवर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये पक्षाने म्हटले आहे की, लोकांच्या समोर मारहाण झाली, तरीही तात्काळ कारवाई करण्यात आली नाही, यामुळे सध्याच्या आघाडी सरकारच्या काळात राजकीय दबावाखाली पोलीस दल कसे एक साधन बनले आहे हे उघड होते.

“हे लज्जास्पद कृत्य सत्तेच्या जवळ असणारे लोक कसे कायद्यापासून कसे सुटतात दिसून येते आणि कायद्याची अंमलबजावनी करणाऱ्या अधिकाऱ्यांना देखील सोडले जात नाहीये,” असे विरीधी पक्षाने म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बीसी जनार्दन रेड्डी यांनी देखील जाहीरपणे त्यांच्या भावाने केलेल्या कृत्याचा निषेध केला आहे. ते म्हणाले की , त्यांनी कोणीही असेल तरी पोलिसांना कारवाई करण्यास सांगितले आहे. रेड्डी हे बंगानापल्ले मतदारसंघातील आमदार आहेत.