चंदीगड  : पंजाबमध्ये २३ मार्चपासून भ्रष्टाचारविरोधात एक हेल्पलाईन सुरू केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री भगवंत मान यांनी गुरुवारी केली. या हेल्पलाईनवर लाच मागणाऱ्या किंवा गैरव्यवहार करणाऱ्या लाचखोर अधिकाऱ्यांची चित्रफीत अपलोड करता येईल. राज्यात भ्रष्टाचार मुक्त सरकार देण्यात येईल, असे ते म्हणाले. दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी मान यांच्या घोषणेचे स्वागत केले आहे. केजरीवाल म्हणाले, आप सरकारने देशाच्या राजघानीला भ्रष्टाचारमुक्त केले आहे. आता मान आणि त्यांचे मंत्री पंजाबमध्ये प्रामाणिक सरकार देतील, असा विश्वास आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anti corruption helpline announcement by punjab chief minister bhagwant mann zws
First published on: 18-03-2022 at 00:02 IST