Anti-immigration protest in london Video : लंडनमध्ये नुकतेच हजारोच्या संख्येने उजव्या विचारसरणीचे समर्थक रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. या स्थलांतरविरोधी मोर्चामधील एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आंदोलक प्रसिद्ध भारतीय स्नॅक ‘कांदा भजी’ विकत घेताना दिसत आहेत. या व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होताना दिसत आहे.

शनिवारी ‘युनाईट द किंगडम’ (Unite the Kingdom) मोर्चादरम्यान हा व्हिडिओ चित्रित करण्यात आला. अतिउजव्या विचारसरणीचा कार्यकर्ता टॉमी रॉबिन्सन (Tommy Robinson) यांनी हा मोर्चा आयोजित केला होता. नुकत्याच अमेरिकन पुराणमतवादी भाष्यकार चार्ली कर्क यांच्या झालेल्या हत्येनंतर काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये १ लाखाहून अधिक लोक सहभागी झाले होते. एबीसी न्यूजच्या (ABC News) म्हणण्यानुसार, आंदोलक मध्य लंडनमधून युनियन जॅक आणि इंग्लंडचा ध्वज घेऊन घोषणा देत निघाले होते. त्यांच्याकडे मॅगा हॅट्स (MAGA hats) आणि इस्रायली ध्वजही होते.

सेंट्रल लंडनमध्ये शनिवारी काढण्यात आलेल्या युनाईट द किंगडम या रॅलीदरम्यान हा व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आलेला आहे. हे आंदोलन अतिउजव्या विचारसरणीचे नेते टॉमी रॉबिन्सन यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला होता. कन्झर्व्हेटिव्ह कमेंटेटर चार्ली कर्क यांची अमेरिकेत गोळी घालून करण्यात आलेल्या हत्येनंतर हा मोर्चा काढण्यात आला होता. या रॅलीत १ लाखाहून अधिक जण सहभागी झाले होते. आंदोलनात सहभागी झालेले निदर्शक हातात यूनियन जॅक आणि इंग्लंडचा झेंडा घेतले होते तर ते मोठ्याने घोषणा देत होते. इतकेच नाही तर काही जणांकडे मेक अमेरिका ग्रेट अगेन टोप्या आणि इस्रायलचे झेंडे देखील होते, असे वृत्त एबीसी न्यूजने दिले आहे.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

आंदोलकांची गर्दी ही ‘आम्हाला आमचा देश परत हवा आहे’ अशा घोषणा देत साऊथ बँक सेंटर येथून वेस्टमिन्स्टरकडे जात होती, यादरम्यान एका आंदोलकाने एका फूड स्टॉलजवळ थांबून कांदा भजी (onion bhaji) विकत घेतली. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली. एक्स हँडल @MikeTown44 ने हा व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओला सात मिलीयनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर वेगळ्याच चर्चेला सुरूवात झाली आहे. एका वापरकर्त्याने लिहिले, इतरांच्या संस्कृतीचा आणि खाद्यपदार्थांचा अनुभव घेण्यात काही गैर नाही. जेव्हा स्थलांतरित किंवा बेकायदेशीर स्थलांतरित असलेले लोक आपली संस्कृती लादण्याचा प्रयत्न करतात तेव्हा खरी समस्या निर्माण होते. इतर लोक आणि त्यांचा इतिहास मला विलक्षण वाटतो.” दुसऱ्या एका वापरकर्त्याने लिहिले की, “मला यात काहीच अडचणीचे दिसत नाही. यापैकी कोणालाही स्थलांतरितांना बाहेर काढायचे नाही. त्यांना फक्त बेकायदेशीरपणे आलेल्यांना बाहेर काढायचे आहे.”

तिसऱ्या एका वापरकर्त्याने प्रतिक्रिया दिली की, “पश्चिमात्य देश असे मल्टिकल्चरॅलिझम स्वीकारू शकतात. आमच्यासाठी तुमचे अन्न तयार करा आणि दुसरे काहीही करू नका.” चौथ्या वापरकर्त्याने म्हटले की, “हे वंशभेदाविरोधातील आंदोलन नाही, तर हे एक बेकायदेशीर स्थलांतरविरोधातील आंदोलन आहे. ते अशा लहान व्यवसायांना पाठिंबा देत आहेत.”

लंडनमध्ये गेल्या कित्येक दशकांमधील झालेले सर्वात मोठे उजव्या विचारसरणीच्या नागरिकांनी केलेले आंदोलन पाहायला मिळत आहे . गार्डियनने दिलेल्या वृत्तानुसार, सुमारे १,१०,००० लोक टॉमी रॉबिन्सन यांच्या नेतृत्वाखालील या निदर्शनांमध्ये सामील झाले .