चीनमधील हांगझोऊ येथील आशियाई क्रीडा स्पर्धेआधी भारत आणि चीनमध्ये तणाव वाढला आहे. या स्पर्धेआधी चीनने हांगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी असलेल्या अरुणाचल प्रदेशच्या तीन खेळाडूंना ऐनवेळी व्हिसा नाकारल्याचा आरोप आहे. यानंतर भारताचे केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी आपला चीनचा दौरा रद्द केला आहे.

चीनने अरुणाचल प्रदेशमधील ज्या तीन खेळाडूंचा व्हिसा नाकारला आहे त्यांच्याबरोबर याआधीही काही महिन्यांपूर्वी चीनमधील एका स्पर्धेत गैरवर्तन झाल्याचा आरोप आहे. आता पुन्हा एकदा या खेळाडूंबाबत गैरप्रकार घडला असून चीनने त्यांचा व्हिसा दिलेला नाही. त्यामुळे या तिन्ही खेळाडूंना आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी इतर खेळाडूंबरोबर जाता येणार नाहीये.

“…म्हणून क्रीडामंत्र्यांचा चीन दौरा रद्द”

चीनच्या या कुरापतींवर भारताने जोरदार प्रतिक्रिया दिली. भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले, “भारताचे क्रीडामंत्री अनुराग ठाकुर आधी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी चीन दौरा करणार होते. मात्र, चीनच्या या निर्णयानंतर आता क्रीडामंत्र्यांचा हा दौरा रद्द करण्यात आला आहे. भारत सरकार आपल्या हितांच्या रक्षणासाठी कटिबद्ध आहे.”

हेही वाचा : Asian Games Live Streaming: ४० खेळ, ४८१ स्पर्धा अन् १००० हून अधिक पदके; हे सर्व सामने कधी, कुठे पाहायला मिळतील? जाणून घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आशियाई क्रीड स्पर्धा २३ सप्टेंबर रोजी सुरू होणार आहे. त्याआधीच चीन आणि भारतामधील संबंध तणावपूर्ण बनले आहेत.