Modi Birthday Special , 17 September : १७ सप्टेंबर म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस. या दिवशी संपूर्ण देशात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वेगवेगळ्या ठिकाणी रक्तदान शिबीर तर काही ठिकाणी सेवा पंधरवडा राबविण्यात येणार आहे. यंदा आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात नसले तरीही त्यांचे चाहते आणि कार्यकर्ते मोदींचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्याच्या तयारीत आहेत. तामिळनाडूमध्ये मात्र थोडं हटके सेलिब्रेशन पाहायला मिळणार आहे.

तामिळनाडू राज्यात भारतीय जनता पक्षाच्या वतीने १७ सप्टेंबरला जमनाला येणाऱ्या नवजात बालकांना चक्क सोन्याची अंगठी देण्यात येणार आहे. सध्या सोन्याची किंमत पाहता, जनतेसाठी ही भेट अतिशय मोलाची ठरणार आहे. याबरोबरच तब्बल ७२० किलोचे मासेही वाटले जाणार आहेत. मत्स्य पालन आणि सूचना व प्रसारण राज्य मंत्री एल मुरुगन यांनी यासंबंधी माहिती दिली आहे.

IPL : नवं वर्ष नवा प्रशिक्षक! रोहित शर्माच्या ‘मुंबई इंडियन्स’ला मिळाले नवे गुरु; २०२३ पासून स्वीकारणार पदभार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चेन्नईस्थित आरएसआरएम हे शासकीय रुग्णालय यासाठी निवडण्यात आले आहे. एल मुरुगन यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने १७ सप्टेंबरला आरएसआरएम शासकीय रुग्णालयात जन्माला येणाऱ्या नवजात बालकांना भेट म्हणून सोन्याची अंगठी देण्यात येणार आहे. प्रत्येक अंगठी जवळपास २ ग्रामची असेल आणि तिची किंमत पाच हजार रुपये इतकी असेल. ते पुढे म्हणाले, ‘ही भेट देऊन आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनी जन्माला येणाऱ्या बालकांचे स्वागत करायचे आहे.’ भाजपाच्या स्थानिक युनिटच्या अंदाजानुसार १७ सप्टेंबरला या रुग्णालयात १० ते १५ बालकांचा जन्म होऊ शकतो.