एपी, राफा

संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी गाझापट्टीचा मदतपुरवठा पुन्हा सुरू करण्याचे आवाहन केले आहे. पॅलेस्टिनी निर्वासितांसाठी संयुक्त राष्ट्रांची मदत संस्था म्हणून काम करणाऱ्या ‘यूएनआरडब्लूए’चे काही कर्मचारी हमासने ७ ऑक्टोबरला इस्रायलवर केलेल्या हल्ल्यात सहभागी असल्याचा आरोप झाल्यानंतर अनेक देशांनी गाझाचा मदतपुरवठा थांबवला आहे.

dharashiv lok sabha marathi news
धाराशिवमध्ये अपक्षा हाती तुतारी, संभ्रम दूर करण्याचे महाविकास आघाडीसमोर आव्हान
demolishing building , citizens, Nandivali, dombivli, trouble of dust
Video : डोंबिवलीत नांदिवलीत रहिवासी, प्रवासी धुळीच्या लोटांनी हैराण; पुनर्विकासासाठी इमारत तोडताना नियम धाब्यावर
supreme court
‘डीजेबी’ला निधी जारी करण्याचे निर्देश
2008 Malegaon bomb blast case
२००८ मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर खरेच आजारी आहेत का ? प्रकृतीची शहानिशा करण्याचे विशेष न्यायालयाचे आदेश

हा मदतपुरवठा पुन्हा सुरू झाला नाही तर ‘यूएनआरडब्लूए’ला फेब्रुवारीमध्येच जवळपास २३ लाख पॅलेस्टिनींच्या साहाय्यामध्ये कपात करावी लागेल असा इशारा गुटेरेस यांनी दिला. जवळपास चार महिन्यांपासून सुरू असलेल्या या युद्धामुळे गाझापट्टीत तीव्र मानवतावादी संकट निर्माण झाले असून जवळपास एक चतुर्थाश लोकसंख्या पुरेशा अन्नापासून वंचित आहे.

हेही वाचा >>>Video : मालदीवच्या संसदेत खासदारांमध्ये हाणामारी; राष्ट्राध्यक्ष मुइज्जूच्या पक्षाची दादागिरी

गुटेरेस यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, ‘‘कर्मचाऱ्यांच्या कथित घृणास्पद कृत्याची त्यांना शिक्षा मिळायलाच हवी, पण ‘यूएनआरडब्लूए’साठी काम करणाऱ्या हजारो महिला आणि पुरुष अत्यंत धोकादायक परिस्थितींमध्ये काम करतात, त्यांना शिक्षा होता कामा नये. येथील लोकसंख्येची तातडीची गरज पूर्ण केलीच पाहिजे.’’

इस्रायलवरील हल्ल्यामध्ये सहभागी झाल्याचा आरोप असलेल्या १२ कर्मचाऱ्यांपैकी नऊ जणांना तातडीने बरखास्त केले असून उर्वरित तिघांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे आणि दोघांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे अशी माहिती गुटेरेस यांनी दिली.

हेही वाचा >>>नवव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नितीश कुमारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मी जिथं होतो…”

युद्धविरामाच्या वाटाघाटी सुरू

इस्रायल आणि हमासदरम्यान युद्धविरामासाठी वाटाघाटी अंतिम टप्प्यात आल्या असल्याचे अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर ‘यूएनआरडब्लूए’च्या कर्मचाऱ्यांवर हे आरोप झाले आहेत. प्रस्तावित करारानुसार हा युद्धविराम दोन महिन्यांचा असेल.

‘यूएनआरडब्लूए’ चे कार्य

‘यूएनआरडब्लूए’चे गाझामध्ये १३ हजार कर्मचारी असून त्यापैकी जवळपास सर्व पॅलेस्टिनी आहेत. १९४८च्या युद्धानंतर, सध्या जो भाग इस्रायल म्हणून ओळखला जातो तेथून घर सोडून गेलेल्या किंवा जाण्यास भाग पडलेल्या निर्वासित कुटुंबांना वैद्यकीय सुविधेपासून शिक्षणापर्यंत मूलभूत सेवा प्रदान करणे हे या संस्थेचे काम आहे. ७ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या युद्धानंतर या संस्थेच्या कामाचा अधिक विस्तार झाला आहे.