पाकिस्तानातून आलेल्या समझोता एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या सहा जणांना ११ पिस्तुलांसह गुरुवारी अटक करण्यात आली. यामध्ये दोन महिलांचा समावेश असून हे सर्वजण उत्तर प्रदेशमधील दंगलगस्त मुझफ्फरनगर येथील राहणारे आहेत.
पंजाबमधील अट्टारी स्थानकामध्ये समझोता एक्स्प्रेसमधील प्रवाशांची तपासणी केली जात असताना मांस कापायच्या यंत्रामध्ये दडवलेली ही पिस्तुले० तसेच २२ मॅगझिन्स सुरक्षा जवानांनी जप्त केली. अटक करण्यात आलेले सर्वजण मुझफ्फरनगर येथे राहणारे असून आपण पाकिस्तानातील नातेवाइकांना भेटायला गेलो होतो, असे त्यांनी चौकशीत म्हटले आहे. उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगर येथे अलिकडेच जाट व मुस्लिम समुदायामध्ये मोठी दंगल उसळली होती. या दंगलीमागे पाक गुप्तचर यंत्रण आयएसआयचा हात असल्याचा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला होता.
संग्रहित लेख, दिनांक 7th Mar 2014 रोजी प्रकाशित
समझोता एक्सप्रेसमधून शस्त्रास्त्र आणणाऱ्या ६ जणांना अटक
पाकिस्तानातून आलेल्या समझोता एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या सहा जणांना ११ पिस्तुलांसह गुरुवारी अटक करण्यात आली.
First published on: 07-03-2014 at 12:20 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arms recovered from samjhauta express