पूंछ : जम्मू आणि काश्मीरमधील पूंछमध्ये कथितरित्या लष्कराच्या कोठडीत झालेल्या मृत्यू प्रकरणाची सोमवारी चौकशी सुरू झाली. लष्कराने प्राथमिक चौकशीदरम्यान ब्रिगेडियर हुद्दयाच्या एका अधिकाऱ्याची बदली केली असून ४८ राष्ट्रीय रायफल्सच्या अन्य तीन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

पूंछ जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर लष्कराने मोठया प्रमाणात शोधमोहीम हाती घेतली आहे. या तपासादरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या तीन संशयितांचे मृतदेह शुक्रवारी आढळून आले होते. मृतदेहांच्या अवस्थेवरून त्यांचा छळ झाल्याची शंका व्यक्त केली जात असून याच्या ध्वनीचित्रफिती समाजमाध्यमांवर पसरल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला असून लष्करानेही चौकशीची घोषणा केली होती. त्यानुसार सोमवारी चौकशी सुरू झाली असून एका ब्रिगेडियर दर्जाच्या अधिकाऱ्याची बदली करण्यात आल्याचे तसेच अन्य तीन अधिकाऱ्यांवर कारवाईची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली. या अधिकाऱ्यांची नावे अद्याप समजलेली नाहीत. कोठडीत कथितरित्या मृत्यू झालेल्या एकाचे नातलग मोहम्मद सादीक यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद रफीक आणि मोहम्मद रशीद हे दोन पोलीस आणि जगी व गणेश अशा दोन खबऱ्यांसह आलेल्या तिघांनी संबंधित व्यक्तीला चौकशीसाठी नेले होते. त्यामुळे हे पोलीस, खबरे तसेच लष्कराच्या मेजरचे नाव तक्रारीमध्ये समाविष्ट करण्याची तसेच राष्ट्रीय रायफल्सचा तळ तातडीने दुसरीकडे हलविण्याची मागणी सादीक यांनी केली.

several injured in multiple stabbing-shooting incident
सिडनीतल्या मॉलमध्ये चाकू हल्ला, चार जणांचा मृत्यू, अनेक लोक जखमी; संशियाताला पोलिसांनी ठार केल्याचं वृत्त
Young Woman, Dream of Joining, Police Force, False Theft Accusation, Forced into Prostitution, Dashed, police, nagpur, nagpur news, marathi news,
पोलिस खात्यात नोकरीसाठी, निवड, पण तिच्या नशिबी वेगळेच काही होते
vasai crime news, wife s murder accused marathi news
वसई: पत्नीच्या हत्येचा आरोपी पॅरोलवरून फरार, वालीव पोलिसांनी ५ वर्षानंतर केली अटक
Rashmi Barve
रश्मी बर्वे प्रकरणावर बुधवारी सुनावणी, जातवैधता प्रमाणपत्रामुळे निवडणूक अर्ज रद्द

हेही वाचा >>> Covid-19 पाठोपाठ JN1 ने चिंता वाढवली, कर्नाटकात तीन जेन.१ बाधित रुग्णांचा मृत्यू, देशभरात करोनाचे ४,०५४ रुग्ण

नियमात राहून चौकशी करा – लष्करप्रमुख

पूंछमध्ये सुरू असलेली अतिरेक्यांची शोधमोहीम आणि कोठडीतील मृत्यूंच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख मनोज पांडे यांनी सोमवारी काश्मीरचा दौरा केला. पूंछ येथे जाऊन त्यांनी शोधमोहीमेत सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. ‘नियमांच्या चौकटीत राहून’ तपास करा, असा सावधगिरीचा सल्ला लष्कप्रमुखांनी आपल्या अधिकाऱ्यांना दिला. लष्कराच्या अतिरिक्त जनसंपर्क महासंचालकांच्या ‘एक्स’ खात्यावर यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.

इंटरनेट सेवा बंदच

शुक्रवारपासून पूंछ आणि राजोरी जिल्ह्यांतील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असून ती अद्याप सुरू करण्यात आलेली नाही. चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या तीन नागरिकांच्या हत्येनंतर अफवा पसरू नयेत व कायदा-सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी ही खबरदारी घेतली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मेहबूबा नजरकैदेत?

तीन नागरिकांच्या हत्या झालेल्या सुरनकोटला भेट देण्याच्या तयारीत असलेल्या पीडीपीच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याचा आरोप त्यांच्या पक्षाने केला आहे.