तालिबानने अमेरिकन नागरिक आणि कायमस्वरूपी रहिवाशांच्या सहा विमानांना ताब्यात घेतलं असून त्यांना सोडण्यापासून रोखत आहे. तालिबानने विमानातील लोकांना ओलिस ठेवल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. अमेरिकेचे प्रतिनिधी मायकल मॅककॉल यांनी फॉक्स न्यूजला रविवारी मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी दावा केला की, सहा विमाने मजार-ए-शरीफ आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या काही दिवसांपासून थांबवण्यात आली आहे. जोपर्यंत अमेरिका तालिबानला अफगाणिस्तानचे सरकार म्हणून मान्य करत नाही, तोपर्यंत ही विमाने उड्डाणे ओलिस ठेवली जाणार आहेत. तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवला असला तरी अमेरिकन अधिकाऱ्यांनी अधिकृतपणे तसे मानण्यास नकार दिला आहे.

परराष्ट्र विभागातील अधिकाऱ्यांनी कायदेकर्त्यांना सांगितले की, विमानांना दोहा, कतारला जाण्याची परवानगी असेल. तिथे जे अफगाणी विशेष स्थलांतरित व्हिसासाठी अर्ज करत आहे, त्यांच्या अर्जांवर प्रक्रिया करत आहे. मात्र जेव्हा तालिबान उड्डाणांना परवानगी देईल तेव्हाच या लोकांचं बाहेर पडणं शक्य होईल.

अडकलेल्या लोकांमध्ये १९ अमेरिकन नागरिक आणि २ ग्रीन कार्ड धारकांसह ६०० ते १२०० लोकांचा समावेश आहे, ही संख्या अधिक दखील असून शकते अशी माहिती मिळतीए. यामध्ये महिला पर्वतारोही, स्वयंसेवी संस्था कामगार, पत्रकार आणि धोका असलेल्या महिलांचा समावेश आहे, असे असिंडच्या कार्यकारी संचालक मरीना लेग्री यांनी सांगितले.

“अमेरिका सहकार्य करत असल्याने या लोकांना शिक्षा देण्याचा तालिबानचा हेतू आहे, त्यामुळे त्यांनी ही विमानं रोखली आहेत,” असे पेंटागॉनचे माजी वरिष्ठ अधिकारी मिक मुलरॉय यांनी सांगितले. मुलरॉय हो टास्क फोर्स डंकर्क या ग्रुपसोबत काम करत होते. जर तालिबान खरोखरच या लोकांना सौदेबाजीसाठी वापरत असेल तर ते आम्हाला मान्य नाही”, असेही ते म्हणाले.