देवमली (अरुणाचल प्रदेश) : अरुणाचल प्रदेश आणि आसाम यांच्यातील आंतरराज्य सीमा वाद २०२३ पूर्वी सोडवला जाण्याची शक्यता आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी सांगितले. ईशान्य भारताला घुसखोरीमुक्त बनवण्याचे प्रयत्न असल्याचे सांगतानाच,  केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या गेल्या आठ वर्षांच्या कार्यकाळात या भागातील ९ हजार अतिरेक्यांनी शरणागती पत्करली असल्याचा दावा शहा यांनी केला. तिरप जिल्ह्यातील  रामकृष्ण मिशन शाळेच्या सुवर्ण महोत्सव समारंभात ते बोलत होते.