चीनद्वारे अरुणाचल प्रदेशातील सहा ठिकाणांचे नामांतरण केल्यानंतर भारताने त्यावर दिलेली प्रतिक्रिया चीनला चांगलीच झोंबल्याचे दिसते आहे. भारताने दिलेली प्रतिक्रिया ही हास्यास्पद आहे, असे चीनच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. भारताने चीनविरोधात दलाई लामा कार्ड वापरल्यास त्याची भारताला जबर किंमत मोजावी लागेल, अशी धमकी चीनने दिली आहे. दलाई लामा म्हणतात म्हणून अरुणाचल प्रदेश आमचे आहे असे भारत म्हणू शकत नाही, असेही चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने प्रकाशित केलेल्या एका लेखात म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अरूणाचल प्रदेशातील सहा ठिकाणांना प्रमाणित नावे देण्याच्या चीनच्या खेळीनंतर भारताने आक्रमक पवित्रा घेतला होता. अरूणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे सरकारने ठणकावून सांगितले होते. परराष्ट्र मंत्रालयाने गुरूवारी पत्रकार परिषदेत यासंदर्भातील आपली भूमिका स्पष्ट केली होती. नाव बदलून बेकायदेशीरपणे कब्जा केलेला प्रदेश कायदेशीर होऊ शकत नाही. अरूणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाळ बागवे यांनी सांगितले होते. चीनचे हे पाऊल मूर्खपणाचे आहे, असे भारताने म्हटले होते. भारताच्या या रोखठोक उत्तराने चीनचा तीळपापड झाला आहे. भारताने दिलेली प्रतिक्रिया हास्यास्पद आहे, असे चीनने म्हटले आहे. दलाई लामा कार्ड वापरला तर भारताला महागात पडेल, असे चीनच्या सरकारी वृत्तपत्रातील लेखात म्हटले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arunachal pradesh renaming row india will pay dearly if it uses dalai lama card says chinese media
First published on: 21-04-2017 at 20:03 IST