गेल्या महिन्यात काही मुस्लीम नेत्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली होती. या भेटीसंदर्भात बोलताना एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi ) यांनी मुस्लीम नेत्यांवर टीका केली आहे. हे सर्व जणं उच्चविभूषीत असून त्यांचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही, असे ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – मोहन भागवत ‘राष्ट्रपिता’ आहेत; सरसंघचालकांच्या मशीद भेटीनंतर मुस्लिमांच्या सर्वोच्च नेत्याचे गौरवोद्गार

गेल्या महिन्यात माजी मुख्य निवडणूक आयुक्त एसवाय कुरैशी, दिल्लीचे माजी लेफ्टनंट गव्हर्नर नजीब जंग, अलीगड मुस्लीम विद्यापीठाचे माजी कुलपती लेफ्टनंट जनरल जमीर उद्दीन शाह, माजी खासदार शाहिद सिद्दीकी आणि उद्योगपती सईद शेरवानी यांनी मोहन भागवत यांची भेट घेतली होती. यावरून असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ” या पाच जणांनी भागवत यांची भेट घेतली. संपूर्ण जगाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा माहीत आहे. मुस्लीम समाजातील हा उच्चभ्रू वर्ग आहे. जमिनीवर नेमक्या काय घडामोडी घडतात, याबाबत या लोकांना माहिती नसते. वास्तविकतेशी यांचा काहीही संबंध नाही. मुळात कोण कोणाला भेटतं हा ज्याचा त्याचा वयक्तिक विषय आहे. हा त्यांचा संविधानिक अधिकार आहे.”, असे ते म्हणाले.

हेही वाचा – काँग्रेस अध्यक्षपदावरुन नेत्यांमध्ये स्पर्धा सुरु असताना राहुल गांधींचं मोठं विधान, निवडणुकीला मिळणार वळण?

गेल्या महिन्याच्या झालेल्या बैठकीसंदर्भात माजी सीईसी कुरैशी म्हणाले होते की ”मोहन भागवत यांनी देशातील परिस्थितीबद्दल काळजी वाटत असल्याचे म्हटले आहे. देशात आज जे वातावरण आहे, ते पूर्णपणे चुकीचे आहे. देश केवळ सहकार्य आणि सामंजस्याने पुढे जाऊ शकतो,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.

हेही वाचा – सरसंघचालकांकडून दिल्लीत मशिदीला भेट, मुस्लीम नेत्यांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण

दरम्यान, आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिल्लीतील एका मशिदीला भेट दिली. भागवत यांनी यावेळी ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे प्रमुख उमर अहमद इलयासी यांचीही भेट घेतली. दोघांमधील बंद दाराआडची ही बैठक जळवपास एक तास चालली. दरम्यान, मोहन भागवत यांनी मशिदीला भेट दिल्यानंतर उमर अहमद इलयासी यांनी त्यांचा ‘राष्ट्रपिता’ म्हणून उल्लेख केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asaduddin owaisi reaction on muslim leaders who meet rss chief mohan bhagwat spb
First published on: 22-09-2022 at 20:38 IST