Asaduddin Owaisi slam india block : गेल्या काही दिवसांपासून बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे. यादरम्यान इंडिया आघाडीमध्ये सहभागी होण्याच्या मुद्द्यावरून AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी सोमवारी इंडिया आघाडीवर जोरदार टीका केली आहे.

एका सार्वजनिक कार्यक्रमात औवेसी म्हणाले की, “एकतर्फी प्रेम होणार नाही… बिहरच्या लोकांनी हे लक्षात घेण्याची आवश्यकता आहे की आमच्यावर करण्यात आलेले आरोप हे खोटेपणावर आधारीत होते आणि त्यांना गरीब आणि पीडितांच्या नेत्याने त्यांचे राजकीय नेतृत्व बनावे अशी त्यांची इच्छा नाही, म्हणून हे आरोप करण्यात आले.” एएनआयने यासंबंधीचे वृत्त दिले.

ओवेसी यांनी प्रतिस्पर्धी पक्षांवर उपेक्षितांचा आवाज दाबल्याचा आरोप केला आहे. “त्यांना बिहारच्या लोकांनी त्यांचे गुलाम बनावे असे वाटते… आम्ही चांगल्या प्रकारे निवडणूक लढू,” असे औवेसी म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि इंडिया आघाडीला तिसरा पर्याय निर्माण करण्याचे समर्थन करताना औवेसी यांनी एआयएमआयएमच्या तिसर्‍या आघाडीचा पुरस्कार केला. “आमचे अध्यक्ष अख्तारूल इमान, म्हणाले आहेत की आपण तिसरी आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे…. हा आमच्याकडून केला जाणारा एक प्रयत्न होता…. बिहारच्या जनेसमोर सर्वकाही एका कारणासाठी आले आहे.”