scorecardresearch

Premium

बोडो दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई

आसाममध्ये सर्वसामान्य आदिवासींवर हल्ला करून तब्बल ७८ जणांची हत्या करणाऱ्या नॅशनल डेमोक्रेटिक फ्रंट ऑफ बोडोलँड (एनडीएफबी) या संघटनेविरोधात केंद्र सरकार कठोर पावले उचलणार आहेत

बोडो दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई

आसाममध्ये सर्वसामान्य आदिवासींवर हल्ला करून तब्बल ७८ जणांची हत्या करणाऱ्या नॅशनल डेमोक्रेटिक फ्रंट ऑफ बोडोलँड (एनडीएफबी) या संघटनेविरोधात केंद्र सरकार कठोर पावले उचलणार आहेत, असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी दिले. या संघटनेचा नायनाट करण्यासाठी भूतानने भारताला मदत करावी, अशी मागणीही गृहमंत्र्यांकडून करण्यात आली. एनडीएफबी संघटनेसारख्याच कट्टरतावादी असलेल्या उल्फा संघटनेचा बीमोड करण्यासाठी भूतानने मदत केली होती, असेही त्यांनी सांगितले.
राजनाथ सिंह यांनी गुरुवारी हल्ले  झालेल्या सोनितपूर जिल्ह्याला भेट दिली आणि परिस्थिती जाणून घेतली. बोडो दहशतवाद्यांचा बीमोड करणे गरजेचे असून, केंद्र सरकारच्या ‘शून्य सहिष्णुता’ धोरणानुसार या दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. केंद्र सरकार याप्रकरणी गंभीर असून, एनडीएफबी संघटनेविरोधात कारवाई करण्याची तयारीही सरकारने सुरू केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
भूतानची मदत
भारत-भूतान सीमेवरील जंगलात बोडो दहशतवाद्यांचे बस्तान असून, त्यांचा बीमोड करण्यासाठी भूतान सरकारची मदत घेतली जाणार असल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले. राजनाथ सिंह यांनी बुधवारी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याशी याप्रकरणी सविस्तर चर्चा केली. स्वराज लवकरच भूतान सरकारशी चर्चा करणार असून, त्यांच्याकडे मदतीची मागणी करणार आहेत. २००३-०४मध्ये भूतान सरकारने उल्फा संघटनेविरोधात मोहीम सुरू केली होती आणि त्यामुळे या देशातून या संघटनेचा नायनाट झाला.
बोडो दहशतवाद्यांचे आसाममधील हल्लासत्र सुरूच असून, गुरुवारीही काही भागांत हल्ले करण्यात आले. कोक्राझार जिल्ह्य़ातील गॉस्साईगाव येथे सकाळी काही घरांवर हल्ले करण्यात आले. काही घरांना आगही लावण्यात आली होती. आसाममधील बोडो दहशतवाद्यांच्या हल्ल्यांत ठार झालेल्यांची संख्या आता ७८ झाली आहे. गुरुवारी सोनितपूर येथे आणखी सहा मृतदेह सापडले.

लष्कर आसाममध्ये
गुवाहाटी : आसाममध्ये ७८ जणांची नृशंस हत्याकांड करणाऱ्या ‘एनडीएफबी’ या दहशतवादी संघटनेचा बीमोड करण्यासाठी लष्कराच्या तुकडय़ा आसाममध्ये दाखल झाल्या आहेत. भूतान आणि अरुणाचल प्रदेश येथील जंगलामध्ये बोडो दहशतवादी दडून बसले असल्याने लष्कराच्या हेलिकॉप्टरने या जंगल परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे.

Proactive action against accused in Sharad Mohol murder case pune news
शरद मोहोळ खून प्रकरणातील आरोपींवर मोक्का कारवाई; मुख्य सूत्रधार गणेश मारणेचा शोध सुरूच
An engineer from Nashik who provided funds to the ISIS terrorist organization is in police custody
आयसिस दहशतवादी संघटनेला वित्त पुरवठा; नाशिकमधील अभियंत्यास पोलीस कोठडी
police registered case against youth for creating communal tension in kalyan
कल्याणमध्ये धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या तरूणाविरूध्द गुन्हा
Five Bangladeshi people arrested in nigadi passports were issued from Goa is revealed
पिंपरी : निगडीत पाच बांगलादेशी नागरिक अटकेत, गोव्यातून पारपत्र काढल्याचे उघडकीस

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Assam violence rajnath singh orders nia probe into ndfb attack as death toll rises to

First published on: 26-12-2014 at 05:16 IST

संबंधित बातम्या

×