स्वदेशी बनावटीच्या ‘तेजस’ फायटर विमानामधून लवकरच ‘अस्त्र’ क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात येणार आहे. ‘अस्त्र’ हे हवेतील लक्ष्याचा वेध घेणारे स्वदेशी क्षेपणास्त्र आहे. ‘अस्त्र’ हे BVR प्रकारातील म्हणजे नजरेपलीकडील लक्ष्याचा वेध घेणारे क्षेपणास्त्र आहे. हे क्षेपणास्त्र एअर टू एअर आहे. म्हणजे यातून शत्रुच्या फायटर विमानावर हल्ला करता येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ध्वनिच्या वेगापेक्षा चार पट अधिक गतीने माच ४.५ या क्षेपणास्त्राचा वेग आहे. तेजसमधून अस्त्रची चाचणी करण्याआधी काही ग्राऊंड ट्रायल्स म्हणजे चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. पुढच्या काही महिन्यात तेजसमधून अस्त्रच्या चाचण्या सुरु होतील असे सूत्रांनी सांगितले. सर्व प्रकारच्या वातावरणात दिवसा-रात्री लक्ष्याचा अचूकतेने वेध घेण्यास अस्त्र सक्षम आहे. सध्या या क्षेपणास्त्राची रेंज १०० किमी आहे. अस्त्रची चाचणी यशस्वी ठरली तर रशिया, फ्रान्स आणि इस्रायलकडून महागडया बीव्हीआर मिसाइल्सच्या खरेदीची गरज पडणार नाही.

अस्त्रच्या मार्क २ आवृत्तीची चाचणी करण्याची डीआरडीओची योजना आहे. पुढच्यावर्षी १६० किमी रेंजच्या अस्त्रच्या नव्या आवृत्तीची चाचणी होईल. सुखोई-३० फायटर विमानामध्ये अस्त्रची चाचणी यशस्वी ठरली होती. २६ फेब्रुवारीला काश्मिरच्या आकाशात झालेल्या डॉगफाईटमध्ये पाकिस्तानने भारतीय फायटर विमानांवर दूर अंतरावरुन हीच BVR मिसाइल्स डागली होती. पण भारताच्या सर्वच फायटर विमानांनी पाकिस्तानचा प्रयत्न उधळून लावला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Astra air combat missile to be soon tested from tejas fighte jet dmp
First published on: 23-11-2020 at 15:21 IST