वादग्रस्त वक्तव्यांनी नेहमी वादात राहणारे उत्तर प्रदेशचे मंत्री आझम खान यांनी सर्वपक्षीय आमदारांना पेन व झाडू भेट दिला. त्याच बरोबर एक पत्रही दिले असून, या दोन्हीपैकी कोणती गोष्ट समाजातील अपप्रवृत्तीचा नायनाट करेल, असा प्रश्न विचारला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान सुरू केले असून, त्याला एका प्रकारे आझम खान यांनी टोला लगावला आहे.
लोकांच्या हाती मोदींनी झाडू देऊन लेखणी हिसकावली आहे अशी टीका आझम यांनी केली होती. त्यामुळे एक प्रकारे हा मोदींना शह देण्याचा प्रयत्न आहे. आझम यांनी एका पिशवीत पेन, झाडू व पत्र आमदारांना अधिवेशन संपल्यावर पाठवले
आहे.
संग्रहित लेख, दिनांक 30th Mar 2015 रोजी प्रकाशित
आझम खान यांच्याकडून आमदारांना ‘अनोखी’ भेट
वादग्रस्त वक्तव्यांनी नेहमी वादात राहणारे उत्तर प्रदेशचे मंत्री आझम खान यांनी सर्वपक्षीय आमदारांना पेन व झाडू भेट दिला.
First published on: 30-03-2015 at 02:21 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Azam khan gifts broom pen to mlas taunts narendra modi