लैंगिक अत्याचार प्रकरणात साधू-संतांचे नाव पुढे आल्याने रामदेव बाबांनी आता साधू-संतांनाच महिलांपासून जरा दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.
हिंदू धर्मातील ग्रंथांमध्ये साधू-संतांनी महिलांपासून दूर रहावे असे म्हटले आहे, त्यामुळे साधू-संतांनी या नियमाचे पालन करत महिलांपासून दूर रहायला हवे, असे वक्तव्य योगगुरू रामदेव बाबांनी केले आहे.
तसेच “ज्या-ज्या साधू-सतांनी आदर्शांचे उल्लंघन केले आहे. ते अडचणीत सापडले आहेत. त्यांना आज अनेक आरोपांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे हिंदू धर्म ग्रंथांतील नियमांचे उल्लंघन केले तर, यापुढेही आरोपांचा सामना साधू-संतांना करावा लागेल” असेही रामदेव बाबांनी अप्रत्यक्षपणे आसाराम बापूंबाबत वक्तव्य केले.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Sep 2013 रोजी प्रकाशित
महिलांपासून लांब राहण्याचा रामदेव बाबांचा साधू-संतांना सल्ला!
लैंगिक अत्याचार प्रकरणात साधू-संतांचे नाव पुढे आल्याने रामदेव बाबांनी आता साधू-संतांनाच महिलांपासून जरा दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.
First published on: 03-09-2013 at 01:16 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Baba ramdev advises sages to maintain distance from women