आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचं मंगळवारी, १० ऑगस्ट २०२१ रोजी पुण्यामध्ये निधन झालं. ते ८१ वर्षांचे होते. गेल्या आठवड्यात प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्रातील सर्व पक्षीय राजकीय नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विटरवरुन बुधवारी सकाळी तांबे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
ट्विटरवरुन श्रद्धांजली अपर्पण करताना मोदींनी तांबे यांचा उल्लेख आयुर्वेदाला जगभरामध्ये प्रसिद्धी मिळवून देणारे असा केलाय. “डॉ. बालाजी तांबे हे आयुर्वेदाला जगभरामध्ये प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी केलेल्या कार्यासाठी सदैव लक्षात राहतील. खास करुन त्यांनी तरुणांना आयुर्वेदाची ओळख करुन दिली. ते त्यांच्या दयाळू स्वभावामुळे कायमच लक्षात राहतील. त्यांच्या निधाने दु:ख झालं आहे. मी त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करतो, ओम शांती,” असं ट्विट मोदींनी केलं आहे.
Dr. Balaji Tambe will be remembered for his numerous efforts to make Ayurveda globally popular, especially among the youth. He was admired for his compassionate nature. Pained by his demise. Condolences to his family and admirers. Om Shanti.
— Narendra Modi (@narendramodi) August 11, 2021
नक्की पाहा >> नितीन गडकरी ते सुप्रिया सुळे… बालाजी तांबेंना श्रद्धांजली अर्पण करताना कोण काय म्हणालं?
तांबे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय होते. त्यामुळेच तांबे यांच्या निधनाच्या वृत्तानंतर शरद पवार यांनी तीन ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पहिल्या ट्विटमध्ये शरद पवार यांनी, “ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य आणि योगतज्ज्ञ डॉ. बालाजी तांबे यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. चिंतनशील मार्गाने अथक केलेली योगसाधना आणि आत्मसंतुलनाचा त्यांनी दाखवलेला मार्ग त्यांच्या असंख्य भारतीय आणि पाश्चात्त्य अनुयायांना सकारात्मक जीवनशैलीचा अवलंब करण्यासाठी पथदर्शी ठरला आहे,” असं म्हटलं आहे.
ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य आणि योगतज्ज्ञ डॉ. बालाजी तांबे यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. चिंतनशील मार्गाने अथक केलेली योगसाधना आणि आत्मसंतुलनाचा त्यांनी दाखवलेला मार्ग त्यांच्या असंख्य भारतीय आणि पाश्चात्त्य अनुयायांना सकारात्मक जीवनशैलीचा अवलंब करण्यासाठी पथदर्शी ठरला आहे. pic.twitter.com/tv3JmUC3Kn
— Sharad Pawar (@PawarSpeaks) August 10, 2021
पुढच्या ट्विटमध्ये त्यांनी बालाजी तांबेकडून उपचार घेतल्यासंदर्भातील आठवणींना उजाळा दिलाय. , “वैयक्तिक पातळीवर मी त्यांचे आयुर्वेदिक उपचार घेऊन त्यांचा स्नेह अनुभवला. जिज्ञासू भाव आणि सातत्याने संशोधन यातून त्यांनी आयुर्वेदाला शास्त्रोक्त पद्धतीने जगासमोर मांडले. त्यांचे तत्त्वज्ञान रोजच्या मानवी जगण्याशी एकरूप झाले आहे,” असं पवार म्हणालेत.
वैयक्तिक पातळीवर मी त्यांचे आयुर्वेदिक उपचार घेऊन त्यांचा स्नेह अनुभवला. जिज्ञासू भाव आणि सातत्याने संशोधन यातून त्यांनी आयुर्वेदाला शास्त्रोक्त पद्धतीने जगासमोर मांडले. त्यांचे तत्त्वज्ञान रोजच्या मानवी जगण्याशी एकरूप झाले आहे.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.— Sharad Pawar (@PawarSpeaks) August 10, 2021
तर तिसऱ्या आणि शेवटच्या ट्विटमध्ये पवारांनी, “त्यांच्या जाण्याने त्यांचे विशाल वैश्विक कुटुंब आज पोरके झाले आहे. डॉ. बालाजी तांबे यांना भावपूर्ण श्रद्धांजली,” असं म्हटलं आहे.
त्यांच्या जाण्याने त्यांचे विशाल वैश्विक कुटुंब आज पोरके झाले आहे. डॉ. बालाजी तांबे यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
— Sharad Pawar (@PawarSpeaks) August 10, 2021
बालाजी तांबे हे आयुर्वेद, योग व संगीतोपचार या विषयांतील तज्ज्ञ तसेच पुणे जिल्ह्यातील कार्ला येथे असलेल्या आत्मसंतुलन व्हिलेजचे संस्थापक होते. तब्बल पाच दशकं त्यांनी आयुर्वेद, अध्यात्म आणि संगीतोपचार यांचा प्रचार व प्रसार केला. समाजातील अनेक घटकांना त्यांनी आयुर्वेदाशी जोडले. आयुर्वेद केवळ राज्य किंवा देशभरापुरतं मर्यादित न ठेवला तांबे यांनी जगभरात प्रसार केला आणि त्याचं महत्व पटवून दिलं.