खलिस्तान समर्थक आणि ‘वारिस दे पंजाब’चा प्रमुख अमृतपाल सिंगला पंजाब पोलिसांनी फरार घोषित केलं आहे. पोलीस अद्यापही अमृतपाल सिंगच्या मागावर आहेत. पण, अमृतपाल सिंग हरियाणाच्या कुरूक्षेत्रातील एका परिसरात महिलेच्या घरी थांबल्याचं समोर आलं होतं. याप्रकरणी बलजीत कौर नावाच्या महिलेला हरियाणा पोलिसांनी ताब्यात घेत पंजाब पोलिसांच्या स्वाधिन केलं आहे. यावर आता बलजीत कौर हिने भाष्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘आज तक’शी बोलताना बलजीत कौरने सांगितलं की, “मी अमृतपालला ओळखत नव्हती. माझी पप्पलप्रीत बरोबर इंन्स्टाग्रामवरून ओळख झाली होती. अमृतपालला पप्पलप्रीतच घरी घेऊन आला होता. दोघांनी जेवण केलं. अमृतपालने आपल्या चेहऱ्यावरील मुखवटा काढला, तेव्हाची त्याची ओळख पटली.”

हेही वाचा : निळा शर्ट, हातात पिशवी अन् डोक्यावर छत्री; अमृतपाल सिंगचा कुरूक्षेत्रातील नवा VIDEO समोर

“जायच्या आधी मोबाईलमध्ये…”

“अमृतपालने माझ्या मोबाईलचा वापर केला होता. दुसऱ्या दिवशी दोघेही सकाळी लवकर उठले. अमृतपाल घरातच होता, तर पप्पलप्रीत बाहेर फिरण्यासाठी गेला होता. त्यानंतर दोघेही दीड वाजण्याच्या सुमारास घरातून निघून गेले. जाण्यापूर्वी अमृतपालने मोबाईलमध्ये काहीतरी शोधलं होतं,” असं बलजीत कौरने म्हटलं.

“अमृतपालने सांगितलं नाही, कुठं जात आहेत. पण, अमृतपालने स्कूटी दिली आणि म्हटलं, पटियालाला सोडून ये. यानंतर मला वाटलं की मी अडकले आहे. अमृतपालने पगडी घातली होती आणि चेहरा झाकला होता. त्याव्यतिरिक्त मला काहीही माहिती नाहीत,” असं बलजीत कौरने स्पष्ट केलं.

हेही वाचा : अमृतपाल सिंग, समर्थकांचा देशविरोधी कारवायांमध्ये सहभाग

दरम्यान, पंजाब पोलिसांनी अमृतपाल सिंगच्या जवळील ४५८ सहकाऱ्यांची एक लिस्ट एनआयएला दिली आहे. ए, बी आणि सी अशा तीन वर्गात त्याला विभागलं गेलं आहे. ए वर्गात १४२ लोक असून, ती २४ तास अमृतपालबरोबर राहत होती. बी गटात २१३ लोक आहेत, जी आर्थिक आणि संघटनेचं काम पाहत. या अहवालानंतर एनआयएच्या आठ टीमने पंजाबामध्ये अमृतसर, तरनतारन, जालंधर, गुरदासपुर, जालंधर जिल्ह्यांत झाडाझडती घेतली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Baljitkauron khalistani suppoter amritpal singh punjab police nia investigation ssa
First published on: 24-03-2023 at 23:36 IST