बंगळुरूमध्ये गेल्या चार दिवसांपासून सतत पाऊस पडतो आहे. २६ जुलैपासून सुरू झालेला हा पाऊस सतत वाढतो आहे. गेल्या चार दिवसांचा अंदाज सांगायचा झाल्यास बंगळुरूमध्ये १३५ मिमी पावसाची नोंद झाली. जी जुलै महिन्याच्या सरासरी पावसापेक्षा ३० मिमी जास्त आहे. गेल्या २४ तासांत पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले असून, पाऊस सतत वाढतच आहे. बंगळुरू विमानतळावर विक्रमी ७१ मिमी पावसाची नोंद झाली. मुसळधार पावसाने येथील तापमान कमी झाले आहे. जागोजागी साचलेले पाणी आणि खोळंबलेल्या वाहतुकीच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. अनेक ठिकाणी वृक्षदेखील उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. आयटी शहरासाठी हा संपूर्ण आठवडा समस्यांनी भरलेला होता. सोमवार ते बुधवारपर्यंत सरकारी बस सेवेच्या संपामुळे रस्त्यावर ट्रॅफिक जामची स्थिती होती. तर गुरुवारी पावसामुळे रस्त्यांवर कोडी झाली होती. पावसाच्या पाण्यात अडकलेल्यांना वाचविण्यासाठी सुरक्षारक्षक नावेचा वापर करत आहेत. तर काही ठिकाणी स्थानिक साचलेल्या पाण्यात मासे पकडत असल्याचेदेखील पाहायला मिळते आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बंगळुरूमधील परिस्थिती दर्शविणारी टि्वटरवरील छायाचित्रे आणि व्हिडिओ –

मासे पकडताना स्थानिक –


घरातील दृश्ये –


बचावकार्याचे छायाचित्र –


बचावकार्यावेळी पाण्यात मिळाला साप –

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bangalore weather heavy rain in bengaluru people seen fishing on roads
First published on: 29-07-2016 at 19:19 IST